तिवसा/ तालुका प्रतिनिधी
स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोझरी येथे अल्पमुदतीच्या विविध नाविन्यपूर्ण आणि स्वयंरोजगारास पूरक अशा अभ्यासक्रमाचा शुभारंभ येत्या 8 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आभासी पद्धतीने होणार आहे.

या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक युवक युवतींनी तातडीने नोंदणी करावी असे आवाहन संस्थेचे प्राचार्य आनंद वाळके यांनी केले आहे.मोझरी आयटीआय मध्ये सोलर पॅनल असिस्टंट टेक्निशियन, लाईट मोटर वेहिकल ड्रायव्हर, प्लंबर, मोबाईल फोन हार्डवेअर टेक्निशियन ,मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग वेल्डर , टू व्हीलर सर्विस टेक्निशियन ,सेल्फ एम्पलोयीड टेलर ,सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन ,डिजिटल मित्रा, असिस्टंट इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिशन डोमेस्टिक सोल्युशन, फिटर फॅब्रिकेशन असे एकूण बारा अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत ,या अभ्यासक्रमाकरिता प्रत्येक व्यवसायात तीस जागा उपलब्ध असून सदर व्यवसायाची फी नाममात्र शंभर रुपये आकारण्यात येणार आहे, हे प्रशिक्षण दिनांक 15 ऑक्टोंबर 2025 पासून सुरू होणार असून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना शासनातर्फे शासन मान्य प्रमाणपत्र मिळणार आहे हे प्रमाणपत्र रोजगार व स्वयंरोजगारास उपयुक्त आहे तरी परिसरातील इच्छुक युवक युवतींनी जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करून सदर संधीचा उपयोग करावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
