अखेर विद्यार्थ्यांच्या संघर्ष पुढे म.रा. परिवहन महामंडळ झुकले
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या शिवणी रसुलापूर येथे बस थांबा असून ही बसेस थांबत नाही त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी AISF व AIYF च्या नेतृत्वात गुरुवारी म. रा. परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा निषेध करत. रास्ता रोको आंदोलन करून दोन तास चक्काजाम केला. यापूर्वी सुद्धा बसेसच्या त्रासाला कंटाळून 2013 व 2015 साली शिवणी रसुलापुर तेथे आंदोलन करण्यात आले.

परंतु त्यानंतर सुद्धा परिस्थिती जशास तशी आंदोलन एक वर्षापासून विद्यार्थ्यांना होत असलेल्या बसेसच्या त्रासामुळे व एस.टी वाहक पालकांच्या अरेरावी व मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने AISF /AIYF च्या नेतृत्वात विद्यार्थी व गावकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल या आंदोलनात विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी आपल्याला प्रवास करताना येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थ्यांसोबत एस.टी वाहक व चालक यांच्याकडून होणारी गैरवर्तणूक व अरेरावी असे विद्यार्थ्यांना आलेले अनुभव विद्यार्थ्यांनी आंदोलनात मांडले. व *’हमारी मांगे पुरी करो’* असे म्हणत अखेर परिवहन महामंडळ प्रशासनाला आपल्या संघर्षामुळे विद्यार्थ्यांनी झुकवले त्यामुळे हादरलेल्या परिवहन विभागाचे वाहतूक नियंत्रक साहेब यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन शिवणी येथील आंदोलनकर्त्यांनी केलेली मागणी 1) शिवणी येथे बस स्थानकावर बस थांबविण्याकरिता कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रक कर्मचारी असावा.2) विद्यार्थ्यांसोबत /प्रवाशांसोबत चालक वाहकाने अरेरावी न करता चांगली वर्तवणूक करण्यात यावी.3) शिवणी येथे थांबा असलेल्या व नसलेल्या सर्व बसेसचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना देण्यात येईल.4) चालक व वाहक कामावर असताना मद्यप्राशन करू नये अशा सूचना देण्यात येतील.5) बस कुठल्याही कार्यक्रमाला व नेत्यांच्या सभेला पाठविल्यास पूर्वसूचना देण्यात येईल.6) सर्व बस थांब्यावर उपस्थित थांबवण्यात येईल अशा सूचना एस.टी कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. असली की आश्वासन यावेळी देण्यात आले. व यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सदर आंदोलनात AISF,AIYF चे कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी, व गावकरी मंडळी उपस्थित होते.
