
महानगर पालिका निवडणुकीबाबत घेतला आढावा
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
शिवसेना( उ.बा.ठा.) चे नेते माजी केंद्रीय मंत्री श्री खासदार अरविंद सावंत यांनी अमरावती शहरातील बैठकीत महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची संघटनात्मक बांधणी, उमेदवारांची निवड आणि शहराच्या विकासाबद्दल चर्चा केली.त्यांनी सांगितले की, प्रत्येक प्रभागात नवे, कार्यक्षम आणि स्थानिक शिवसैनिक उमेदवार उभे करायचे आहेत. शहराच्या पायाभूत सुविधांवर भर, स्थानिक प्रश्नांची जाण असलेले उमेदवार, आणि संघटन मजबूत ठेवण्यावर त्यांनी भर दिला. व त्यांनी प्रत्येक विभाग प्रमुखांशी चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधला यावेळी सुधीरभाऊ सूर्यवंशी,संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख मनोजजी कडू,नरेंद्रजी पडोळे, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख बोपशेट्टी,माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण हरमकर,माजी उपमहापौर रामाभाऊ सोळंके,आशावरी देशमुख, नगरसेवक प्रशांत वानखडे, दिगंबरजी मानकर, डॉ.तायडे,कुरेकर ताई, लक्ष्मी शर्मा,नितीनजी हटवार, महानगरप्रमुख महिला शहर प्रमुख जयश्री जटाळे,यांचेसह सर्व प्रभाग प्रमुख विभाग प्रमुख व शाखाप्रमुख उपस्थित होते.