
आमदारांचे,खासदारांचे दुर्लक्ष;भाविकांची- नाराजी..
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अमरावती यवतमाळ रोडला लागून शिरपूर येथील प्राचीन,पुरातन,जागृत श्री हरिहर संस्थान येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या संस्थांना क दर्जा प्राप्त सुद्धा आहे.सध्या श्रावण महिना सुरू आहे,
त्यानिमित्त श्री हरिहर संस्थान शिरपूर येथे भाविक भक्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत आहे. परंतु रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट असल्यामुळे नागरिकांना तसेच भाविक भक्तांना प्रवास करण्याकरिता अत्यंत त्रास सहन करावा लागत आहेत. हे देवस्थान अत्यंत जुने व वर्षापूर्वीचे आहे, महाशिवरात्रीला सुद्धा येथे मोठ्या प्रमाणात यात्रा असते,तेव्हा सुद्धा हजारोच्या संख्येने भाविक भक्त येतात तरी अद्यापही रस्ता झालेला नाही.या महत्त्वपूर्ण रस्त्याकडे प्रशासन व या मतदासंघातील आमदार,खासदार आणि लोकप्रतिनिधीचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या रस्त्याची सुधारणा व डांबरीकरण होण्यासाठी ग्रामस्थांनी या आधी या विभागाचे आमदार आणि प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु येथील ग्रामस्थांच्या वाटेला केवळ निराशा आली आहे.