तालुक्यात शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेलुगुंड,धानोरा फसी,हिंगलासपूर आणि जयसिंगा या गावांमध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकांवर येलो मोजॅक व चारकोल रॉट या रोगांचा तीव्र प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे पिके मोठ्या प्रमाणावर उध्वस्त झाली असून शेतकऱ्यांच्या कष्टाचे सारे श्रम पाण्यात गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.सदर गावांमध्ये नुकतेच माजी आमदार प्रा.विरेंद्र जगताप यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

शेतकरी वर्गाची झालेली झालेली आर्थिक हानी पाहता तातडीने शासनाने पंचनामे करून मदत द्यावी,अशी मागणी प्रा. जगताप यांनी प्रशासनाकडे केली.शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले की, सततच्या हवामानातील अनिश्चिततेमुळे तसेच रोगराईमुळे दरवर्षी शेतमालाचे मोठे नुकसान होत आहे.खर्च वाढला असून उत्पादन घटत चालले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.प्रा. जगताप यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की,आपल्या प्रश्नांबाबत ते शासन दरबारी पाठपुरावा करतील. तसेच शेतकरी हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव आपल्या पाठीशी उभे राहतील,असे आश्वासन शेतकऱ्यांना यावेळी प्रा. विरेंद्र जगताप यांनी यावेळी दिले.
