
नागपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
विश्वविक्रम यशाचा गौरव व विदर्भ नॅशनल व कला, सामाजिक परिषद आणि पुरस्कार समारंभ या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील मधुरम ऑडिटोरियम, विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सिताबर्डी नागपूर येथे एक भव्य सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात कृषी, सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक, क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यावेळी अमरावती येथील शेखर बडगे यांना त्यांच्या २५ वर्षांच्या कृषी क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी आणि शेतकऱ्यांना दिलेल्या विविध सेवा, मार्गदर्शन व सल्ला यासाठी डॉ. रवींद्र कोल्हे, भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त, ज्येष्ठ समाजसेवक, मेळघाट यांच्या हस्ते ‘कृषी गौरव रत्न अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले.शेखर बडगे यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळात विविध कृषी संस्था, सहकारी संघटना, तांत्रिक सल्लागार गट आणि शेतकरी उत्पादन कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, जैविक शेती, कृषी प्रशिक्षण आणि शेतीसाठी बाजारपेठ निर्माण करण्याचे कार्य यशस्वीरीत्या पार पाडले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते डॉ. रवींद्र कोल्हे, भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त, ज्येष्ठ समाजसेवक, मेळघाट,प्रा. डॉ. बी. एन. खरात, तर प्रमुख उपस्थितीत होते मा. मोनिका पीटर डांटास, प्रसिद्ध समाजसेविका, नवी मुंबई, मा.जगदीश भद्रे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष – करप्शन निर्मूलन संघर्ष समिती, मोरेश्वरजी निस्ताने, संगीत दिग्दर्शक व पार्श्वगायक डॉ. प्रशांत गायकवाड, समाजसेवक अनंत भारसाकळे, नागपूर,राहुल उके अमरावती, रविंद्र दिघोरे नागपूर कार्यक्रमाला नागपूर व विदर्भातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पुरस्कार विजेते, कार्यकर्ते, कलावंत व समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेखर बडगे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, ग्रामीण कृषी व्यवस्थेतील त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायक ठरत आहे.