अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
श्री विवेकानंद सेवा संघ द्वारा संचलित नेरपिंगळाई येथील श्री विवेकानंद कन्या विद्यालयातील वयोगट 14 वर्षे आतील भाविका कणेर लांब उडी 1st’ 200m. run 3rd तर श्रृतिका सपकाळ High Jump 1st , 400m 2 nd’ आराध्या राऊत ‘ सृष्टि ढोरे यांचा यशस्वी सहभाग राहिला तर 17 वर्षीय कांचन धुर्वे हिने आणि श्रावणी इंगळे हिने गतीच्या मर्यादा मोडणारी ती पावले हवेलाही मागे टाकणारी झेपावणारी धाव घेवून ‘100m 1st ‘ 200 m 1st ‘ 4×100 रिले 1st ‘ उंचउडी 1st येवून मैदान गाजविलेत .तर सृष्टि क्षीरसागर हिने पौरुषी मक्तेदारी मोडीत थाळीफेकीत 1st येण्याचा बहुमान प्राप्त केलात. विद्यार्थ्यांनी 2025 च्या ‘तालुका स्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत अफाट कौशल्य , जिद्द ‘ चिकाटी ‘अथक परिश्रमामुळे ‘ विना तक्रार ‘ संवेदनशील नेतृत्व ‘ सकारात्मक उर्जा ‘ मूल्याधिष्ठीत स्पर्धाभाव ‘ परिश्रमाची प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्व विकासाचा उत्सव आम्ही जिंकलोय .पुन्हा एकदा क्रीडास्पर्धेच्या कुंभमेळ्यात सिद्ध केलेत. मैदानी क्रीडा स्पर्धा ही यशाची वाटचाल नव्हे तर ‘ स्वत्वाच्या शोधाची धाव आणि यशाने मातीवर उमटलेल्या अनुभूतीची ती पाऊलवाट त्यांनी अनुभवली . शिक्षणासोबत खेळ हा यशस्वी जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हावा. हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात भर घालणारी आहे . निष्कलंक स्पर्धा भावना ‘ हे त्यांना शिकता आले. त्यांच्या अत्यंत प्रामाणिक यशामागे विद्यार्थ्यांचीच अपार मेहनत ‘ जिद्द तसेच शिक्षकांचे श्री.आडे सर , श्री. तट्टे सर , श्री.कडू सर यांचे मार्गदर्शन ‘ पालकांचा भक्कम पाठिंबा , शिस्त नियम आणि सकारात्मक स्पर्धात्मक दृष्टिकोन यामुळे विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी राहिली .त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.श्री.धनंजय तट्टे सर ,श्री.शिवाजी पाटील सर ‘ प्रा.अरविंद तट्टे सर ,श्री.बाबुजी तट्टे सर ,श्री .पी.आर .देशमुख सर , श्री. अजय तट्टे सर ,सन्मा. पदाधिकारी तथा संयोजन समिती श्री. तारापुरे सर ‘अनिलभाऊ जावळे श्री.हिवसे सर ‘ श्री. ठाकरे सर ,आणि’ पालकवृंद ‘ केंद्रप्रमुख श्री. वानखडे सर ‘ श्री. निंघोट सर ‘श्री लांडे सर ‘ प्रीती सावरकर ‘वर्षा पातूरकर यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन करीत भविष्यात संधीच सोनं करीत राज्य ‘राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरीने जिंकावं. अशा शुभेच्छा दिल्यात. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतूकाचे सत्र सुरु आहे* . *विद्यार्थ्यांनो ‘ तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचा शिल्पकार ! शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा देशमुख यांनी आशीर्वाद दिलात.
