
शाहू- फुले- आंबेडकर सामाजिक संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमांचं संपन्न
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
शाहू फुले आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, जि प माध्यमिक शाळा आरोग्य मंदिर आणि ग्रामपंचायत रेवसा यांच्या संयुक्त विद्यमानाने रेवसा येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रम संपन्न.अमरावती दरवर्षी २१ जून रोजी, योगाच्या अनेक फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने रेवसा गावामध्ये शाहू फुले आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने, आयुष्यमान आरोग्य मंदिर रेवसा, जिल्हा परिषद शाळा रेवसा आणि ग्रामपंचायत रेवसा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात गावातून फेरी काढून योगाचे महत्त्व सांगून करण्यात आली. यानंतर विविध योगासने, प्राणायाम तसेच योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली. लहान मुलांना चॉकलेट वाटून त्यांच्या आनंदात भर घालण्यात आली. या कार्यक्रमाला अगदी छोट्या बालकासह वयोवृद्ध नागरिकांनी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून योगाचे प्रात्यक्षिके करण्यात आली. त्यासोबतच तेथील उपस्थित सर्वांनी योग साधना त्या ठिकाणी करण्यात आली. संस्थेच्या वतीने योग साधने बद्दल संपूर्ण माहिती व आपल्या आरोग्याला योग साधना किती गुणकारी आहे. यावर प्रकाश टाकण्यात आला.
आरोग्य ही खरी संपत्ती आहे. ही संपत्ती कमावली तर इतर गोष्टीही सहज साध्य करता येतात.
योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे; ते मन आणि शरीराच्या ऐक्याचे प्रतीक आहे; मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद; विचार, संयम, पूर्तता;आणि आरोग्य कल्याणासाठी पूरक आहे. योग आपल्याला स्वतःचा शोध घेण्यास आणि निसर्गाशी जोडण्यास मदत करते. आपल्या बदलत्या जीवनशैलीत योगाभ्यास समाविष्ट करण्याच्या दृष्टीने जागतिक योग दिवस साजरा करावा आणि योग साधनेसंबंधी जनजागृती करावी.”
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ वर्षा चव्हाण यांनी पदभर सांभाळला त्यासह प्रमुख पाहुणे म्हणून अँड श्री उमेशजी इंगळे , डॉ मानकर साहेब ,ग्रामविकास अधिकारी चव्हाण साहेब,मुख्याध्यापिका श्रीमती मालधुरे मॅडम ,संस्था सचिव सचिन ढोके,अँड आशिष मनोहर, शैलेश पवनीकर , अँड नंदकुमार मुलताईकर,क्रांतीसुर्य मानकर, स्वप्निल पाटील ,सचिन खोब्रागडे , बाबारावजी खडसे, मंगेश वानखडे ,रामचंद्र मुंदाने,तसेच शिक्षक वृंदांमध्ये गरपाल मॅडम, पानझाडे मॅडम, बोबडे मॅडम, साबळे सर ,रायबोले सर ,
अंगणवाडी विभागातून वंदना कडू, रजनी नांदने, कविता महल्ले या सेविकांनी व हर्षा अंबोरे या मदतनीस यांनी यांनी सक्रिय सहभाग घेतला. हंसराज अंबोरे व गजानन जोंधळे हे ग्रामपंचायत कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम हसत-खेळत, आनंदमय वातावरणात पार पडला आणि सर्वांनी दररोज योगाभ्यास करण्याचा संकल्प केला.
👌👍