
सालोड ( कसबा ) / अंकुश निमनेकर
आपण चांगल्या विद्यालयात शिक्षण घेत असून संस्थेने शाळेला सर्व सोयीयुक्त भौतिक सुविधा व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. याचा आपण चांगला उपयोग घेऊन त्या देशाचे आदर्श नागरिक व्हा आणि देशाची व समाजाची आपल्या हातून सेवा घडू द्या. विद्यार्थी शाळेत शिकत असताना त्यांचा सर्वांगीण विकास होणे अत्यंत महत्त्वाचे असून तो शिस्तप्रिय नागरिक घडला पाहिजे.
या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित असलेले समाजभूषण मधुकरराव अभ्यंकर हे सतत समाजात महापुरुषांचे कार्य समाजात पेरण्याचे तसेच शैक्षणिक संस्थेच्या मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे कार्य करीत आहेत. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष क्षितिज अभ्यंकर यांनी सालोड (कसबा) येथील शाहू महाराज विद्यालय व श्री वसंतदादा पाटील कनिष्ठ महाविद्यालया तसेच श्रीमती अभ्यंकर प्री प्रायमरी स्कूल मधील आयोजित केलेल्या शालेय गणवेश वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्ह युवक काँग्रेसचे अध्यक्ष पंकज मोरे, श्री हेमंत जाधव,शाखा व्यवस्थापक एसबीआय, श्री प्रकाश इंझळकर, श्री मोबीन भाई, रमेशराव ठाकरे, सुनील पाटील इंझळकर, सतीश पाटील इंझळकर उपस्थित होते. याप्रसंगी हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण तसेच वृक्षारोपणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री पंकज मोरे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की आज जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर पात्रता सिद्ध करावी लागते याकरिता अभ्यासाचे नियोजन करण्याचे मूलमंत्र दिला. तसेच शिक्षण संस्था चालवणे एवढे सोपे काम नाही संस्थाध्यक्ष समाजभूषण मधुकरराव अभ्यंकर यांनी त्यांच्या कार्य कुशलतेने व तळमळीने सर्व दूर शिक्षण पोहोचवले आणि महापुरुषांचा वारसा पुढे नेला विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबरच समाजामध्ये नागरिक होण्याचाही प्रयत्न केला.तसेच प्रमुख पाहुणे श्री हेमंत जाधव म्हणाले की स्पर्धेच्या युगात विद्यार्थी सर्व गुण संपन्न होणे गरजेचे आहे आपल्या स्पर्धकाला कमी नेहमी सतर्क प्रमुख मुकाबला करणे आवश्यक आहे आपण चांगल्या विद्यालयात शिक्षण घेत असून शाळेला सर्व भौतिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे त्याचा फायदा आपण घेऊन एक चांगला नागरिक घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री क्षितिजदादा अभ्यंकर यांचा मुख्याध्यापक/ प्राचार्य अविनाश पवार यांच्याहस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच श्री पंकज मोरे आणि श्री हेमंत जाधव यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष शे श्री क्षितिजदादा अभ्यंकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बोर्डाच्या परीक्षेमध्ये दहावीची कु. माही बगळे व बारावीची कु पायल राऊत ह्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्याहस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला, तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा तसेच सामान्य ज्ञान स्पर्धा, चित्रकला स्पर्धेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचासुध्दा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रमोद इंझळकर, जगदीश ढगे, योगेश गावंडे, अंकुश निमनेकर, सुमेध लोणारे, नितेश भोंगरे, राहुल कुणबीथोप, अक्रम भाई, हन्नन भाई, नितीन घवळे, सूरज सर, चिंटू सर पाहुणेमंडळी उपस्थित होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक/ प्राचार्य अविनाश पवार तर सूत्रसंचालन सौ रुपाली वीचे यांनी केले. तर आभार कु.गार्गी मुधोळकर हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.अनिल गवई, प्रा. वैशाली राहाटे, प्रा. मोहिनी माकोडे, प्रा. मोनू सरदार ,माधव कानबाले,विनोद इंगळे, विकास फसाटे, आकाश वंजारी, प्रदीप नितनवरे, तुषार रामटेके, गोरखनाथ पर्वतकर, शंकर मेहरे, शुभम इं झळकर, वैष्णवी तिवसकर, प्रगती इंझळकर, रोषनी घवळे, रूपाली हारगुळे ,उमेश विलायतकर,गजानन भोंगरे, सविता राऊत आदींनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताची सांगता राष्ट्रगीताने झाली.