पोलीस प्रशासन सज्ज
मोर्शी/ संजय गारपवार
मोर्शी शहरात अनंत चतुर्दशीला 49 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात श्री गणेशाची विधीवत स्थापना करण्यात आली होती. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्कृष्ट देखावे सुद्धा सादर केले होते. गेल्या 13 दिवसापासून श्री गणपती बाप्पाची मनोभावना पूजन करून मोर्शी शहरात दिनांक मंगळवार 9 सप्टेंबर रोजी काही गणेशोत्सव मंडळाचे विसर्जन होणार आहे.

बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी कॉलनी परिसरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे विसर्जन होणार आहे. तर दिनांक 11 सप्टेंबर रोजी गौरक्षणाच्या प्रांगणावर राधाकृष्ण गणेश मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या मोर्शी चा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या गणपतीचा ढोल ताशाच्या गजरात विसर्जन सोहळा पार पडणार आहे. तीन ही दिवस गणपती बाप्पाचा विसर्जन मेंगवाडी तसेच सालबर्डी येथील माळु नदीच्या पात्रात होणार आहे.

पोलीस प्रशासन सज्ज
शहराच्या विविध भागात 49 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली होती. गणेश स्थापनेच्या आधी मोर्शी पोलिसांच्या वतीने शांतता कमिटीची बैठक घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना देण्यात आल्या होत्या. तेरा दिवस चाललेल्या गणेश उत्सवा दरम्यान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सूचनेचे तंतोतंत पालन केले होते. शहरात विसर्जन सोहळा तीन दिवस सतत चालणार असल्यामुळे या विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
