
चांदूर बाजार कबड्डी लीगला तालुक्यात चर्चेला उधान
चांदूर बाजार / एजाज खान
तालुक्यातील निर्मिती स्कूल येथे स्व केशवदादा टोम्पे यांच्या स्मृती प्रित्यर्थ चांदुर बाजार फिजिकल अकॅडमी व श्री हनुमान क्रीडा मंडळ चांदूरबाजार , जगदंब क्रीडा मंडळ चांदूरबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने चांदुर बाजार फिमियर कबड्डी लीगचे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये स्व केशवदादा टोम्पे, छत्रपती शिवाजी महाराज , यांच्या फोटोचे पूजन व ग्राउंड चे पूजन करून कबड्डी लीग स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या स्पर्धेत एकूण ६ नामांकित संघ सहभागी झाले होते या मध्ये प्रथम क्रमांक माधान संघाने पटकवला तर उपविजेता नागपूर संघाने पटकवला यांना जीवन आधार संस्थेचे अध्यक्ष जीवन जवंजाळ यांच्या कडून 10,000 रोख व तर भास्करराव टोम्पे यांच्याकडून सन्मान चिन्ह देण्यात आले तर उपविजेता संघ यांना माजी नगर सेवक आनंद उर्फ टिकू अहिर यांच्या कडून 6000 रु रोख तर सन्मान चिन्ह प्रभाकरराव चौधरी यांच्याकडून देण्यात आले या कबड्डी लीग ला तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतया कबड्डी लीगमध्ये माधान, चांदूर बाजार, पापळ, भंडारा, नागपूर आणि कोंडवर्धा येथील संघ यांनी आपापल्या कौशल्याचे सादरीकरण दाखवले . ही स्पर्धा म्हणजे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची उत्तम संधी होतीप्रत्येक सामन्यात संघर्ष आणि कौशल्य याचा संगम पाहायला मिळाला या मध्ये मोठ्या संख्येने पैश्याची जगी लूट पाहायला मिळाली या मध्ये प्रत्येक सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळाडू याला सुयोग गोरले यांच्याकडून सन्मानचिन्ह तर बेस्ट रेडर 1000 रु तुषार खोंड सर यांच्या कडून , बेस्ट डिफेंडर1000 रु प्रणित देशमुख सर यांच्या कडून तर उत्कृष्ट खेळाडू 1000 रु सुयोग गोरले यांच्या कडून तर बेस्ट डिसिप्लिन संघ1000 रु महेश भुले सर यांच्या कडून , असे अनेक पुरस्कार देण्यात आले निर्मिती स्कूल चे मैदान प्रेक्षकांनी गजबजून झाले असून, स्थानिक पातळीवर या स्पर्धेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती.कबड्डीप्रेमींनी या रोमांचक लीगचा आनंद मोठ्या संख्येने घेतला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कार्यक्रम चे अध्यक्ष भास्करराव टोम्पे, प्रमुख पाहुणे ठाणेदार अशोक जाधव, जीवनराव जवंजाळ, मनोज भाऊ कटारिया, अतुल रघुवंशी माजी नगरसेवक, आनंद उर्फ टिकू अहिर माजी नगरसेवक ,पत्रकार सागर सवळे , तुषार खोंड मुख्याध्यापक,चांदूरबाजार फिजिकल अकॅडमी चे मार्गदर्शक सुयोग गोरले, निर्मिती स्कूल येथील विद्यार्थी व मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी व कबड्डीपटू उपस्थित होते