आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य आयोजन
राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांची प्रमुख उपस्थिती
माहूर / तालुका प्रतिनिधी
निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व मराठी पत्रकार दिनानिमित्त जि. प. प्रा. शाळा भोजंती तलाव केंद्र. तालुका माहूर या शाळेतील विद्यार्थ्यांना दिनांक 16/12/2026 रोजी सकाळी 11.00 वाजता छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या परिसरात करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार हे उपस्थित होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रा.राजेंद्र केशवे, श्री गोपू महामुने नगरसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष माहूर, माजी उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी, श्री गणेश सूर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार वसंतरावजी कपाटे, डॉक्टर पद्माकर जगताप, शाळेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ सोनकांबळे, व शालेय समिती सदस्य तसेच कार्यक्रमाला सूत्रसंचालन करण्यासाठी शिक्षण परिषदेचे एस एस पाटील यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर तालुका कमिटी चे तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार, तालुका उपाध्यक्ष समाधान कांबळे,

संजय वडस्कर, अंबादास मुकटे, गोपाल चव्हाण, मनोज जाधव, राजू दराडे, युनूस खान, आदेश बेहरे, गोपाल खापर्डे, प्रवीण बर्डे, आदी खंदारे यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला व कार्यक्रमादरम्यान प्राध्यापक राजेंद्र केशवे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, नगरसेवक गोपू महामुने, ज्येष्ठ पत्रकार वसंतरावजी कपाटे या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनिल माडपेलीवार यांनी केले शेवटी अध्यक्षीय समारोप गणेश जी कचकलवार सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम संपूर्ण देशभर राबविण्यात येईल असे आश्वासित केले. तदनंतर आभार प्रदर्शन एस एस पाटील सर यांनी केले.

