अमरावती ग्रामीण पोलिसांची कारवाई
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
शेतातील पिके व साहित्य चोरणाऱ्या आरोपीस अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीचे नाव सुनिल राजाराम मोरे (वय ३० वर्षे, रा. चुरमाडा, जि. खंडवा, म. प्र.) असे आहे.दि. २०/०६/२०२५ रोजी रात्री आरोपीने नांदगाव खंडेश्वर येथील शेतातून डिझेल इंजिन पंप व रेडिओ कंपनीचा जुन्या प्रकारचा मोबाईल अशी एकूण मूल्य ८,०००/- रुपयांची चोरी केली होती. याबाबत नांदगाव खंडेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून डिझेल पंप व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीचा एकूण मुद्देमाल रु. ३७,०००/- असल्याचे पोलिसांनी सांगितले.ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद,अप्पर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत,किरण वानखडे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मुलचंद भांबुरकर,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व नांदगाव खंडेश्वर पोलिस ठाण्याचे अमोल देशमुख,मंगेश लकडे, सचिन मसांगे,दिनेश कनोजिया,सागर धापड,विकास अंजीकर आणि पो.स्टे.सायबर चालक पो.को.हर्षद घुसे, यांनी केली.
