
सर्व विभागाणी संवेदनशील गटासाठी सचेत असणे गरजेचे- जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
दिनांक 11/7/2025 रोजी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती, व HIV संबंधित इतर सभा जिल्हाधिकारी श्री.आशिष येरेकर तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संजिता मोहपात्रा,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्री दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ श्री सुरेश आसोले तसेच इतर सर्व विभागाचे अधिकारी, सामाजिक संस्था त्यांचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाल्या. या सभेच्या सुरवातीला विशेष बाब म्हणून तृतीयापंथी यांनी दत्तक घेतलेल्या बाळाचे लिंग प्रमाणपत्र याची अडचण निर्माण झाली होती ते प्रमाणपत्र एक विशेष समिती स्थापन करून निर्णय घेऊन जिल्हाधिकारी यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आलं.या सभेमध्ये एच आई व्ही संबंधित घटक जसे एच आई व्ही संक्रमित व्यक्ती, तृतीयापंथी, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीया, स्तलांतरित कामगार, ट्रक ड्रायव्हर्स तसेच त्यांच्या सोबत असलेले सहकारी, यांच्या संदर्भात त्यांची ओळखपत्र, सामाजिक सुरक्षा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या योजना देताना जास्त सचेत असावे असे मा. जिल्हाधिकारी यांनी सभेच्या अध्यक्ष पदावरून बोलताना सांगितले तसेच कुठल्याही ठिकाणी या घटकांच्या बाबतीत्त कुठल्याही प्रकारचा कलंक व भेदभाव होणार नाही याची काळजी सर्व अधिकारी कर्मचारी सोबतच विभाग प्रमुख यांची राहील असे सांगितले. या सभे मध्ये सर्व कार्यक्रमाच्या आढ्याव्या सोबतच, जिल्ह्यातील आजच्या एच आई व्ही Army स्थितीवर आणि इतर सामाजिक संरक्षण योजना बद्धल चर्चा करण्यात आली.या सभेला मा. जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर सर, मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती श्रीमती संजिता मोहपात्रा, मा. श्रीमती शैलेजा एम., मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिलीप सौंदळे, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसोले, मा. आरोग्य अधिकारी महानगर पालिका डॉ विशाल काळे, बाह्यसंपर्क वैध्यकीय अधिकारी डॉ प्रशांत हेडाऊ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ परिसे, जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ रमेश बनसोड, शहरी क्षयरोग अधिकारी डॉ फिरोज खान, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, रक्त संक्रमण अधिकारी आशिष वाघमारे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री डी के वानखडे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैध्यकीय अधीक्षक डॉ विनोद पवार, जिल्हा क्षयरोग रुग्णालयाचे वैध्यकीय अधीक्षक डॉ संजय पवार, पोलीस आयुक्त कार्यालयाचे मा. श्री शिवाजी बचाटे, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे मा. श्री देशमुख, मा. प्रवीण गुरु, जया नायर उडान ट्रस्ट मुंबई, प्रकाश शेगोकार, श्रीमती विद्या तायडे, अंजली देशमुख, ब्रिजेश दळवी, राजेंद्र साबळे, राजेश तुपोने, परमेश्वर मेश्राम, एकता निखिल खंडारे, स्वप्नील इंगळे, पी टी खडसे, इरफान काझ, दामोदर गायकवाड, भूषण कावरे महिला बाल कल्याण विभाग, इत्यादी हजर होते.