
संत सुरेश बाबा संस्थान, फुबगांव या संत नगरीत ‘गुरु पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संस्थान मध्ये गुरुवार दिनांक 10/07/2025 ला गुरु पौर्णिमा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या गुरूंची पूजा विधिवत करण्यासाठी हजारोच्या संख्येने सुरेश बाबा माऊलींचे भक्त दूर दुरून संत नगरी फुबगांव येथे सकाळ पासून येत भक्त होते. फुबगांव मध्ये नवचैतण्याचं वातावरण निर्माण झाले.आजच्या दिनाचे महत्व जाणून संस्थानमध्ये ह. भ. प. अनिकेत महाराज यांच्या सुमधुर वाणीतून कीर्तनाच्या माध्यमातून मानवी जीवनात गुरुचं स्थान किती आनंद देतात यांचे दाखले महाराजांनी आपल्या कीर्तनातून दिलेत.भक्त कीर्तनात तल्लीन होऊन गेलेत. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सांगता काल्याने करण्यात आली. सर्वात शेवटी आलेल्या भाविक भक्तांनी महाप्रसाद घेऊन पुन्हा माऊली चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला.या उत्सवात गावातील हरिपाठ मंडळ, गुरुदेव मंडळ, महिला भजनी मंडळानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.