
सर्वत्र होत आहे अभिनंदनाचा वर्षाव
पिंपरी चिंचवड / प्रतिनिधी
पुणे पिंपरी चिंचवड,सनं २०२४/२०२५, या शैक्षणिक वर्षात, संकल्प बहुद्देशीय सामाजिक संस्था अंतर्गत, श्री. संत गजानन इंग्रजी माध्यमाच्या भोसरी पुणे येथे राबविलेल्या मुल्य शिक्षणाच्या विविध उपक्रमाबद्दल आणि सामाजिक उपक्रमाबद्दल,हेमं व्हरचूज अवार्ड,२०२५, साठी भारतातून ५१, शाळे पैकी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधुन सन्मान प्राप्त ठरली,
दिनांक,२८/०६/२०२५, शनिवार रोजी,योगी सभागृह दादर मुंबई येथे कार्यक्रमांत, / हेमा फाउंडेशनचे चेअरमन, श्री. महेंद्र काबरा, शिप्रा काबरा राष्ट्रीय सचिव (हेमा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ) धिरज सोनार, संशोधन विभाग प्रमुख, डॉ. चिनु अग्रवाल व ट्रस्टी , शिप्रा जाजू यांच्या हस्ते शाळेचा सन्मान करण्यात आला, कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्री. स्वामी गोविंद गीरी महाराज राम जन्मभूमि अयोध्या खजिनदार, केंद्रीय मंत्री श्री. नितीन जी गडकरी, सिने अभिनेते श्री. राजपाल यादव, श्री. मनोज जोशी, यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली, या वेळी हेमा फाउंडेशनचा सर्वोच्च सन्मान स्विकारण्यासाठी, संकल्प बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. मनोहर शिरकरे, तसेच शाळेच्या प्रिंसीपल सौ. जया शिरकरे, पदवीधर शिक्षक, निलेश मेहेंगे, मयुर शिरकरे, पदवीधर शिक्षिका, कविता भाट,मिनल गावडे , पल्लवी पांडे, तसेच, अमरावती जिल्हा शाखा क्रमांक (४) हातुर्ण सातुर्ण पांढरी अमरावती च्या प्रिन्सपल कोमल बिल्लेवार , /कांचन गोरलेवार, सीमा वाजगे ,श्रृती गावडे,शैला जाधव,पुनम तेलगोटे, आणि हेमा फाउंडेशनचे पदाधिकारी सौ. ज्योती कन्नाडे यांच्या प्रयत्नाने उपक्रमात भाग घेऊन,शाळेचा गौरव वाढविणारे सर्व विध्यार्थ्यांचे कौतुक होत आहे .आणि शाळेने प्राप्त केलेल्या यशा बद्दल सर्व स्थरातुन अभिनंदन होत आहे, शाळेमध्ये विध्यार्थी च्या, वर्तन, संवाद, आणि विचारा मध्ये सकारात्मक बदल घडवून जिवन मुल्यांवर आधारीत शिक्षण प्रणाली प्रभावीपणे उपक्रम राबविले जात आहे, हा आनंदाचा क्षण पिंपरी चिंचवड मधील सर्वांसाठी गौरवाचा क्षणं आहे, आणि शाळेच्या सर्व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे,