
संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथे प्रवेश प्रक्रियेला आरंभ
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
दहावी बारावीनंतर आयटीआय च्या विविध कोर्समुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्याकरिता मोठी संधी उपलब्ध झाली आहे हे अभ्यासक्रम तात्काळ व कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्याकरिता उपयुक्त आहेत , संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये असेच अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी व्यवसायाचे अनेक कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध आहेत , नुकताच आयटीआयच्या प्रवेश नोंदणीला सुरुवात झालेली आहे , प्रवेश प्रक्रियेला आता अधिक वेग मिळणार असून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने अखेर प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार, विद्यार्थी २६ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील, तर पहिली गुणवत्ता यादी ९ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. यापूर्वी केवळ नोंदणीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. आता संचालनालयाने संपूर्ण प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करत प्रवेशाची दिशा स्पष्ट केली आहे.
वेळापत्रक –
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीखः २६ जून, सायं. ५ वाजेपर्यंत
प्रवेश अर्ज निश्चित करण्याची मुदतः २७ जून, सायं. ५ वाजेपर्यंत
पसंतीक्रम / प्राधान्य सादर करणे: २७ जून, सायं. ५ वाजेपर्यंत
प्राथमिक गुणवत्ता यादी: ३० जून, सकाळी ११ वाजता
हरकती सादर करण्याची मुदतः १ जुलै, सायं. ५ वाजेपर्यंत
अंतिम गुणवत्ता यादी : ३ जुलै, सायं. ५ वाजता
पहिली प्रवेश यादी : ९ जुलै, सायं. ५ वाजता
प्रत्यक्ष प्रवेश (प्रथम फेरी): १० ते १५ जुलै, सायं. ५ वाजेपर्यंत
दूसरी प्रवेश फेरी : २३ ते २८ जुलै
तिसरी प्रवेश फेरी : २८ जुलैपासून
चौथी प्रवेश फेरी : ४ ते ८ ऑगस्ट
संस्था स्तरावर समुपदेशन फेरी – २१ ऑगस्ट
संत गाडगेबाबा शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , अमरावतीचे वैशिष्ट्ये सुसज्ज वाचनालय व डिजिटल ग्रंथालय , भव्य मुलांचे वसतिगृह , निसर्गरम्य वातावरण परिसर , क्रीडांगण , जिल्हास्तरीय राज्यस्तरीय खेळांचे आयोजन , राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनीचे आयोजन , रोजगारासाठी नियमित नामांकित कंपन्यांचे कॅम्पसचे आयोजन , सर्व प्रशिक्षणार्थ्यांना नियमानुसार पाचशे रुपये प्रति दरमहा विद्यावेतन , सर्व व्यवसाय करिता अनुभवी व तज्ञ निदेशक वर्ग उपलब्ध , उद्योगधंद्यातील तज्ञांची व्याख्यान व मार्गदर्शन , संस्थेत राष्ट्रीय सेवा योजनेचा अंतर्भाव अशा सुसज्ज आयटीआय मध्ये प्रवेश घेण्याकरिता गरजू विद्यार्थ्यांनी आपला ऑनलाईन अर्ज या वेबसाईट www.dvet.gov.in/admission वर सादर करून संस्थेत मूळ प्रमाणपत्र तपासून कन्फर्म केल्यानंतर व्यवसाय विकल्प देणे गरजेचे आहे , जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा , शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , अमरावती येथे प्रवेश करता विकल्प भरून द्यावे , असे आवाहन संस्थेच्या उपसंचालक सौ सुधा ठोंबरे मॅडम यांनी केले आहे.