
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणलागू असलेल्या अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांना मिळणार लाभ
विद्यापीठाकडून अधिसूचना जारी
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्याथ्र्यांना आता फुल कॅरीऑन लागू करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेने नुकत्याच संपन्न झालेल्या सभेत याबाबतचा निर्णय घेतला आहे. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी विद्याथ्र्यांच्या हितार्थ हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याची अधिसूचना (क्र. 17/2025) 16 जुलै, 2025 रोजी जारी करण्यात आली आहे. यामुळे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू असलेल्या अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांना याचा लाभ मिळणार असून विद्याथ्र्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
ज्या अभ्यासक्रमांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारसी लागू झालेल्या नाहीत, अशा बी.एड., एम.एड., एम.पी.एड., विधी, बी.एस.डब्ल्यू. अभ्यासक्रम वगळून शिखर संस्थांद्वारे निर्धारित केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून चारही विद्याशाखांमधील ज्या अभ्यासक्रमांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाले आहे, अशा सर्व सी.बी.सी.एस. पदवी अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षाकरिता ‘फुल कॅरीऑन’ लागू करण्यात आले आहे या निर्णयामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू असलेल्या सी.बी.सी.एस. पदवी अभ्यासक्रमांच्या विद्याथ्र्यांना शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी ‘फुल कॅरीऑन’ चा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या आदेशानुसार कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी दिली आहे. तरी सर्व विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षकांनी याची नोंद घ्यावी, असे विद्यापीठाच्यावतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी विद्यापीठाच्यावतीने कळविले आहे.