
अर्ज करण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे दरवर्षी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, जलव्यवस्थापन, जलसंवर्धन, जैवविविधता संवर्धन, अपारंपारिक उर्जा स्त्रोताचा वापर, जनजागृती व पर्यावरण संवर्धन आदी क्षेत्रात पर्यावरणपुरक उत्कृष्ट कार्य करणा-या विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालये, शाळा व सामाजिक भावनेतून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणारे, सक्षम प्राधिकारणांकडे नोंदणीकृत विविध प्रतिष्ठाने आणि स्वयंसेवी संस्था यांंना संस्थागत ‘अ’ गटात, तर पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणारे व्यक्ती यांना ‘ब’ गटात पर्यावरण पुरस्कार प्रदान केल्या जातो. आजवर या क्षेत्रात कार्य करणा-या अनेक संस्था व व्यक्तींना हा पुरस्कार देवून विद्यापीठाच्यावतीने सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार राष्ट्रीय प्रदुषण नियंत्रण दिन दि. 02 डिसेंबर, 2025 रोजी ससन्मान विद्यापीठाव्दारे प्रदान केल्या जाईल.
पुरस्काराचे स्वरुप
विद्यापीठाच्यावतीने दिला जाणारा पर्यावरण पुरस्कार हा पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणा-या संस्था व व्यक्ती गटात प्रदान केल्या जातो. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतिचिन्ह, गौरव प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, संस्थागटात रु. 15,000 /- रु, रोख, तर व्यक्तीगटात रु. 10,000 /- रोख असे आहे. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
पर्यावरण क्षेत्रात विद्यापीठाचे दिशादर्शक कार्य
पर्यावरण संवर्धन क्षेत्रात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने भरीव कार्य केले आहे. विद्यापीठाचा 450 एकराचा परिसर निसर्गरम्य आहे. सर्व प्रकारचे वृक्ष, वनसंपदा या परिसरात मोठ¬ा डौलदारपणे उभी आहे. विविध प्रजातीचे पशू पक्षी, मोठमोठे जलाशय, दुतर्फा झाडे असलेले रस्ते या परिसरात आहेत. एकूणच शहराचा ऑक्सिजन पार्क म्हणून हा परिसर नावारुपास आला आहे. पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उच्चतम कामगिरीबद्दल दोन राष्ट्रीय व तीन राज्यस्तरीय पुरस्कार देवून भारत सरकार व राज्य सरकारने विद्यापीठाचा गौरव केला आहे. विद्यापीठाच्या उद्यान विभागाने विशेष परिश्रम यासाठी घेतले आहेत.
अर्ज कसा करावा
संस्था व व्यक्ती गट असे दोन पुरस्कार दिले जाणार असून ज्या संस्था व व्यक्तीला आपले नामांकन अर्ज सादर करावयाचे आहेत, त्यांनी 31 ऑगस्ट, 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत विद्यापीठाच्या आवक शाखेत सादर करावयाचे आहेत. त्या तारखेनंतर आलेल्या आर्जांचा विद्यापीठाच्यावतीने विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासंदर्भात सविस्तर माहिती विद्यापीठाच्या ध्र्ध्र्ध्र्.द्मढ़डठ्ठद्व.ठ्ठड़.त्द या वेबसाईटवरील अवॉर्डस् अॅन्ड अचिव्हमेंट वर उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्यामध्ये काही अडचण असल्यास विद्यापीठ उद्यान अधीक्षक श्री अनिल घोम यांचेशी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा मो. क्र. 9922911101 यावर संपर्क साधता येईल.