
नवी दिल्ली/ प्रतिनिधी
सिने अभिनेता आणि गोरखपूरचे खासदार रवी किशन यांना संसदेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठित ‘संसदरत्न पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार भारतीय संसदीय कार्यक्षमतेचा गौरव मानला जातो.या गौरवप्रसंगी अमरावतीचे सुपुत्र व महाराष्ट्र शासनाच्या राज्य युवा धोरणाचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. मनीष गवई यांनी रवी किशन यांचे विशेष स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले. या भेटीदरम्यान सामाजिक आणि युवा नेतृत्व विषयक चर्चा झाली.रवी किशन यांना मिळालेला हा पुरस्कार तरुणांसाठी प्रेरणादायक ठरत असून, संसदेमधील सक्रियतेचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.