
हर हर महादेव, बम बम भोले चा गर्जनेने तळेगाव ग्राम दुमदुमले.
तळेगाव दशासर / मो.शकील
संपूर्ण भारतभर श्रावण सोमवार निमित्त वेगवेगळ्या भागात जल घेऊन महादेवाच्या पिंडीवर अर्पण करण्याकरता अनेक शिवभक्त कावड यात्रेचे आयोजन करीत असतात. याचाच एक भाग म्हणून तळेगाव दशासर येथील सनातनी हिंदू कावड यात्रा समिती विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे भव्य कावड शोभायात्रेचे आयोजन दिनांक 4 ऑगस्ट 2025 ला दत्तापूर धामणगाव रेल्वे ते तळेगाव दशासर असे करण्यात आले होते. धामणगाव रेल्वे येथील शिवमंदिर येथून सकाळी 7 वाजता शोभायात्रा काढण्यात आली.
हर हर महादेव , बमं बम भोले अश्या गर्जनेसह यात्रा समोर जात होती. होते. यामध्ये शेकडो तरुणांनी आपल्या खांद्यावर कावड घेऊन ते जल मदनेश्र्वर मंदिराच्या पवित्र शिवलिंगावर अर्पण केले वेगवेगळ्या ठिकाणी या शोभायात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले चहा, नाश्ता अशा अनेक स्वरूपामध्ये शोभायात्रेचे स्वागत झाले धामणगाव नारगावडी,आसेगाव, जळका पटांचे, देवगाव या मार्गे तळेगाव मध्ये पोहोचले कावड यात्रेच्या यशस्वी ते करिता सनातन हिंदू कावड यात्रा समिती विश्व हिंदू परिषद बजरंग दल तळेगाव द. तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारकरी , सकल हिंदू समाज येथील सर्व कार्यकर्त्यांना अथक परिश्रम घेतले.