समीर देशमुख व इरफान खान.यांचा एन आय एस कोर्स यशस्वी
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
नुकताच भारत सरकारच्या द्वारा संचालित भारतीय खेल प्राधिकरण यांच्यावतीने नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पटियाला ( पंजाब ) द्वारा कुस्ती कोर्स साठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे जेष्ठ पैलवान समीर दीपक देशमुख व इरफान खान या दोघांचा प्रवेश घेतला होता. त्यांनी एन आय एस कुस्तीमध्ये आपला कोर्स पूर्ण करून यशस्वीरित्या संपन्न केला. पटियाला येथे त्यांनी आधुनिक कुस्ती तंत्रज्ञान अवगत करून प्रमाणपत्र मिळवले. ज्ञानाच्या भरोशावर अमरावती जिल्ह्यातील व. विदर्भातील . पैलवानांचा कुस्तीमध्ये विकास व्हावा, युवकांनी कुस्तीमध्ये भाग घ्यावा राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी प्रतिनिधित्व करता यावे म्हणून समीर देशमुख व इरफान खान हे प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील फार कमी युवक हा कोर्स करतात. पण श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभागाचा वैद्य, डॉ माधुरी चेंडके, डॉ संजय तीरथकर नेहमी प्रयत्नशील असतात या विदर्भातील या अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण खेळाचा विकास झाला पाहिजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर युगांनी भाग घेतला पाहिजे म्हणून. सगळ्यांना प्रोत्साहित करत .असतात.. समीर देशमुख आणि इरफान खान यांनी एन आय स्कोर्स पूर्ण केल्याबद्दल संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रामध्ये एक आनंदाचा वातावरण निर्माण झालेला आहे पद्मश्री प्रभाकर वैद्य . त्यांनी या दोघांचे सुद्धा अभिनंदन केले व पुढील कार्य करिता शुभेच्छा दिल्या.

