
मराठा सेवा संघाचे जिल्हाधिका-यांना निवेदन
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
अक्कलकोट येथे नियोजित कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड गेले असता, त्यांच्यावर भाजपचा पदाधिकारी व सराईत गुन्हेगार दीपक काटे व साथीदारांनी प्रविण गायकवाड यांच्यावर शाई फेक करीत भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा निषेध मराठा सेवा संघ अमरावती च्या वतीने करण्यात आला. दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेन्द्र फडवणीस यांना लेखी निवदेनाव्दारे करण्यात आली.प्रविण गायकवाड हे फुले शाहू आंबेडकर आदीं महापुरुषांचे विचार जनमाणसात पोहचविण्याचे कार्य करीत आहे.बहुजन समाजातील युवक स्वावलंबी कसा बनेल यासाठी प्रविण गायकवाड यांनी जिवन वाहून घेतले आहे. त्यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारा नाही. भ्याड हल्ल्याचा हा पुर्वनियोजित कट आहे. त्वरीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेन्द्र फडवणीस यांना लेखी निवदेनाव्दारे मराठा सेवा संघाने केली.निवेदन देतेवेळी मराठा सेवा संघाचे अरविंद गांवडे, मनोहर कडू, अश्विन चौधरी, संजय ठाकरे, मंजू ठाकरे,रणजित तिडके संजय ढोरे,सोपान भा.साबळे,संदीप वैद्य,शरद काळे,रावसाहेब वाटाणे,मनोज सोळंके,समीर नांदुरकर,प्राची नांदुरकर,याहया खाॅ पठाण,दिनकर काळे,शोक कविटकर,संजय पाटील,प्रदीप पाटील,रवी मोहोड, निलेश सोनटक्के, संकेत गायकवाड, अजय लेंडे, गजानन टाले, गजानन कोरे, राजेन्द्र अढाऊ, सुरेंद्र गांवडे, हरिदास उल्हे, नितीन चौधरी, लोकेश म्हाला, अरविंद पागृत, मैथिली पाटील यांच्यासह आदींची उपस्थीती होती.