समाजातील सर्वच स्तरावरून होत आहे कौतुकाचा वर्षाव
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
क्रांती ज्योती बिग्रेड संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष समाजभूषण देवानंद गणोरकर यांनी मलेशियाची राजधानी कॉललमपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय फेस्टिवल मध्ये माऊथ ऑर्गन वाद्य उत्कृष्टपणे सादर केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र व गौरव चिन्ह प्रदान करून आयोजकांनी सन्मानित केले.अखिल लोककला सांस्कृतिक संघटना पुणे यांनी सदर आंतरराष्ट्रीय फेस्टिवलचे आयोजन केले होते. यापूर्वी देवानंद गणोरकर यांनी संगीत क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी महात्मा फुले फेलोशिप अवॉर्ड, अण्णाभाऊ साठे स्मृती राज्यस्तरीय समाजसेवक पुरस्कार, महाराष्ट्र शासन समाजकल्याण विभागाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, बँकॉक व सिगापूर येथील आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात सुवर्णपदक वप्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. देवानंद गणोरकर हे मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या मधापुरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून अकोला जि.प. कुरूम सर्कलचे माजी सदस्य म्हणून त्यांनी अनेक विकासात्मक कामे केलेली आहेत.सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल क्रांती ज्योती बिग्रेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. नंदेश अंबाडकर, कृषक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर वानखडे, प्रदेश पदाधिकारी ओमप्रकाश अंबाडकर, राजाभाऊ खवले, विनय चौधरी, प्रदीप शेवतकर, प्रा. सुरेश यावले, डॉ. विजय भोजने, इंजि. सुभाष गोहत्रे आदींनी देवानंद गणोरकर यांचे कौतुक केले.
