विश्राम गृह अमरावती येथे जिल्हास्तरीय कवी,गायक गायिका व कलावंतांची बैठक
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
मानवी समाजाला जागृत करण्यामध्ये कलावंताचा सिहाचा वाटा असून या कलाकारांनी समाजाला दिशा देणायचे मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळे कलावंत हे समाजाचे खरे प्रबोधनकार ठरतात असे प्रतिपादन भारत सरकार युवा पुरस्कारार्थी,माजी सिनेट सदस्य,विशेष कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र सरकार राज्य युवा धोरणाचे निमंत्रित सदस्य डॉ मनीषजी गवई यांनी केले ते स्थानिक विश्राम गृह अमरावती येथे गायक गायिका कलावंत यांच्या बैठकित प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या बैठकीचे अध्यक्ष मा.निर्मलजी सरदार महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय सुरेशभाऊ दहीकर हे होते.या बैठकीला जिल्हातील सर्व तालुक्यातील कलावंत उपस्थित होते कवी,गायक,गायिका व कलावंतांची संघटनात्मक व रचनात्मक संघटन विधायक मार्गाने नोंदणी व्हावे या संदर्भात उपस्थित असलेल्या सर्व कलावंतांनी आपले विचार प्रकट केले या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय कवी क्रांतीभूषण खडसे भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कारार्थी म्हणाले की अनेक वर्षापासून फुले शाहू आंबेडकरी चळवळतील अनेक गायक,गायिका,कवी होऊन गेले ज्यांनी आपल्या गायनातून फुले शाहू आंबेडकरांचे विचार प्रसार आणि प्रचार केला आणि मानवी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु या सर्व कलावंतांच्या जीवनात विविध समस्या निर्माण झाल्या असतात त्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी एक तरी विधायक संघटना अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या तरी अस्तिवात नाही अमरावती जिल्ह्यामध्ये विधायक संघटना नोंदणी कृत व्हावी जेणेकरून कलावंतांच्या पाठीशी हे संघटन उभे राहू शकेल व त्यांना मदत करू शकेल.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ मनीष गवई यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतामध्ये म्हणाले की कलावंत हा समाजाचा आरसा असतो तो मानवी कल्याणासाठी मानवी समाजाच्या दशा आणि दिशा ठरविणारा परिवर्तनवादी मार्गदर्शक असतो जीवनाच्या शेवटी शेवटपर्यंत फुले शाहू आंबेडकर गाडगेबाबा,राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या विचाराच्या गीतातून आपल्या वाणी मधून प्रसार आणि प्रचार करीत असतो परंतु जेव्हा जेव्हा एखाद्या कलाकारांवर आपत्ती येते तेव्हा समस्या निर्माण होतात त्या सोडविण्यासाठी,त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या योजनांमध्ये लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात तेव्हा त्यांच्या मदतीला हे विधायक संघटन आवर्जून समोर येईल व त्यांना मदत करेल त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील कलावंतांचा मेळावा हा दिल्ली सारख्या राजधानीमध्ये संपन्न व्हावा इथला कलावंत,कलाकार हा राष्ट्रीय पातळीवर पोहोचायला हवा त्यांच्या मनसन्मान व्हावयास हवा यावर्षी 2025 च्या राष्ट्रीय कलावंत पुरस्कारांसाठी अमरावती जिल्ह्यातील कलावंतांची निवड व्हावी व इथल्या कलावंतांनी राष्ट्रपती भवन बघण्यासाठी या संघटना मार्फत मदत केल्या जाईल. मी आज या संघटनेला शब्द देतो की येणाऱ्या 2025 च्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी पाच कलावंतांची निवड करून संघटनेने माझ्याकडे पाठवावी त्यांना मी राष्ट्रीय स्तरावरून पुरस्कारासाठी निवड करेल. बैठकीमध्ये आलेल्या तमाम कलावंतांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या बहुमतावर त्यांच्या बहुमताने या संघटनेचे अध्यक्ष म्हणून माननीय कवी क्रांतीभूषण खडसे यांची निवड करण्यात आली ही निवड सर्वांनुमते एकामताने करण्यात आली.या सर्वांनी याला होकार व पाठिंबा दिला.अशा या नवनिर्वाचित अध्यक्षांचा मी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करत आहे आणि भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतआहो. या बैठकीचे अध्यक्ष मा. निर्मल सरदार म्हणाले कि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा मुलं मंत्र दिला त्या प्रमाणे एक चांगली कलावंतांची संघटना सपष्ट उद्दिष्टे असणारी,कार्यक्षम व्यवस्थापन असणारी,कुशल नेतृत्वाने चाल वली जाणारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी युक्त कवी,गायक, गायिका व कलावंताच संघटन असावं यामध्ये कामाची विभागणी केली जाते सदस्यांना त्यांची भूमिका स्पष्ट असते आणि त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वजण समन्वय साधून काम करतात,विधायक नोंदणीकृत संघटनेच्या यशासाठी स्पष्ट संवाद,सकारात्मक वातावरण आणि कार्यकर्त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे महत्वाचे असते. अश्या या नोंदणीकृत संघटनेच्या अध्यक्ष पदासाठी अमरावती जिल्ह्यातील उपस्थित असलेल्या कलावंतांनी एक मुखाने व एक मताने मा. कवी,क्रांतिभूषण इरभानजी खडसे यांची निवड केली त्याला मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मान्यता देत व आपण सर्वाना शुभेच्छा देतो कारण संघटनेला कुशल नेतृत्वाची गरज असते,जे कार्यकर्त्यामध्ये निष्ठा निर्माण करू शकते आशा कार्यक्षम नेतृत्व आपल्याला मिळाले आहे आशा निर्वाचित अध्यक्ष मा. कवी,क्रांतिभूषण खडसे यांच मी पुष्प गुच्छ देऊनस्वागत करतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय विशू दादा उर्फ विशुद्धानंद जवंजाळ राष्ट्रीय भारत भूषण समाज भूषण व राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्राप्त यांनी केले.या कार्यक्रमाचे संचालन संविधान भाऊ मनोहरे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक यांनी केले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन य साहिल भाऊ मोरे गायक अंजनगाव सुर्जी यांनी केले. या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील तमाम कलावंत उपस्थित होते.मा. विलास भाऊ शिरसाठ,मा.गजानन गेडाम,मा.सारंग पाटील,मा.दीपक वानखडे,मा.शिवा मनोहरे,मा.आदेश पाटील,मा.विजय गुडदे,सन्माननीया स्मिता शिंगाडे,डॉ.जी.एस. नवाडे,मा.नंदकिशोर पाटील,आ.सदानंद जोशी,मा.भारत तसरे,मा.कैलास वाहने,मा.गजानन सुर्वे,मा.दिगंबर आत्राम,मा.शिवा मेश्राम,मा.संजय सूर्यवंशी,मा.मिलिंद गुडघे, मा.अरुण भालेराव, मा.हिरालाल मोहिते, मा.मिलिंद खाक्षे, मा.विजयदादा पाटील, मा.आनंद तायडे, मा.भीमराव मोहोड, मा.धर्मपाल पोहेकर, मा.विलास स. शिरसाट,मा.रामभाऊ म.शिरसाठ,मा.अनिल पाटील,मा.विलास शिरसाट,मा.मुरलीधर डहाणे , मा.रवी कुमार गजभिये,मा.दीपक इंगळे. मा. अनिल उके,मा.स्वप्नील पाटील,मा.प्रवीण खंडारे,मा.सुमेध गोस्वामी,मा.गुनाभाऊ पाटील,मा.शुभम सहारे,मा.रवींद्र जमाणिक,मा.सलीम शहजादा,मा.अनिल उके उपस्थित होते.या कार्यक्रमाचा आयोजन माननीय दादा उर्फ विशुद्धानंद जवंजाळ राष्ट्रीय अवार्डी व अमरावती शहरातील कलावंतांनी केले.

