
साजिद अली यांना विदर्भ गौरव पुरस्काराने सन्मानित
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धवलसरी येथील रहिवासी आणि एपीजे अब्दुल कलाम ह्युमॅनिटी अँड पीस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. साजिद अली सईद अली यांना १४ जून २०२५ रोजी नागपूरच्या रेश्मी बाग चौकातील कविवर्य सुरेश भट सभागृहात विदर्भ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वीर शिव छत्रपती संघटना, एसआरएन फिल्म प्रोडक्शन, न्यूज इंडिया २४ यांनी १४ जून २०२५ रोजी प्रदान केला. साजिद अली यांना त्यांच्या सामाजिक कार्याच्या दृष्टीने हा पुरस्कार देण्यात आला आहे. साजिद अली नेहमीच शिक्षण, महिला, मानवी हक्क, शांतता इत्यादी विषयांवर काम करत असतात.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूरचे राजे मुधोजी भोसले होते. यासोबतच, सागर निकम सिनेअभिनेता, निर्माते, दिग्दर्शक, झी मराठी, सोनी मराठी, मराठी चित्रपट जीवा शिव फेम मराठी निर्माते मधुर भांडाकर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करून श्री. साजिद अली यांना सन्मानित करण्यात आले.सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार साजिद अली यांना देण्यात आला. हा सन्मान मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.