नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
स्वर्गीय तुकाराम बिडकर ग्रामविकास प्रतिष्ठानने. स्वर्गीय तुकाराम बिडकर यांच्या जयंतीनिमित्त ज्ञान, कला, क्रीडा, या तीन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींना त्रिस्तरीय पुरस्कार जाहीर केले असून. स्वर्गीय तुकाराम बिडकर त्रिस्तरीय पुरस्कारामध्ये ज्ञानरत्न पुरस्कारामध्ये ललित ट्युटोरिअल्सचे सर्वेसर्वा प्रा. ललित काळपांडे, कलारत्न पुरस्काराने सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रा. निलेश जळमकर व क्रीडा रत्न पुरस्काराने एकलव्य क्रीडा अकादमी चे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त , क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे सदानंद जाधव यांना देण्यात आला.स्वर्गीय तुकाराम बिडकर यांनी ज्ञान, कला, क्रीडा, या तिन्ही क्षेत्रात त्रिसूत्री घेऊन महाराष्ट्रातील ग्रामीण भागात, युवक युवतींना समाज निर्मिती व राष्ट्रनिर्मिती या मूळ प्रवाहात आणण्याचे काम केले ह्या कार्यास पुढे नेणाऱ्या व्यक्तीस त्यांच्या नावाने हे पुरस्कार देऊन हे समाजकार्य येणाऱ्या पिढीकडून अविरत चालू राहावे यासाठी पुरस्काराची सुरुवात त्यांचे बंधू ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर व प्रकाश बिडकर यांनी केली स्वर्गीय तुकाराम बिडकर हे सदानंद जाधव यांचे गुरु आहे. जय बजरंग क्रीडा मंडळाचे संस्थापक आणि विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष दिवंगत प्राध्यापक तुकाराम बिडकर यांच्या मार्गदर्शनात सदानंद जाधव यांची धनुर्विद्या खेळाची सुरुवात झाली त्यांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी घेऊन सदानंद जाधव यांनी एकलव्य क्रीडा अकादमीची स्थापना केली आणि अनेक राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, खेळाडू घडविण्याचे काम आजही सुरू आहे. तुकाराम बिडकर यांची प्रेरणा घेऊन त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील शेतकरी शेतमजुराचे मुलं घडविण्याचे सातत्याने अविरत प्रयत्न सुरू आहे. अनेक खेळाडूंना शासकीय नोकरी सुद्धा या खेळाच्या माध्यमातून मिळाली. सदानंद जाधव हे तुकाराम जी बिडकर यांचा वारसा पुढे चालविण्याची जबाबदारी पार पाडत असल्याने स्वर्गीय तुकाराम बिडकर विकास प्रतिष्ठानने यांना क्रीडा रत्न पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार खालील मान्यवरांच्या उपस्थितीत बहाल करण्यात आला. माजी मंत्री गुलाबराव गावंडे, गजानन दाळु गुरुजी, खासदार अनुप दादा धोत्रे, माजी आमदार हरिदास भदे, राधाताई बिडकर आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदाताई खेडकर, कुलगुरू विनायक देशपांडे, शत्रुघ्न बिडकर ( उपाध्यक्ष महाराष्ट्र मुख्याध्यापक संघटना) प्रकाश बिडकर ( अध्यक्ष हनुमान प्रतिष्ठान) व जय बजरंग परिवार कुंभारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
