दर्यापूर /रामेश्वर माकोडे
येवदा ग्रामपंचायत कार्यालय येथे राजस्व मंडळ येवदा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक .24 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आले. सामान्य नागरिक व शेतकरी केंद्रबिंदू मानून महसूल विभाग कार्यरत असून” सेवा पंधरवाडा”2025 अंतर्गत वरील शिबिराचे आयोजन करून यामध्ये शेतकरी, नागरिक ,विद्यार्थी यांना विविध प्रकारचे दाखले ,सातबारा , फेरफार , जिवंत सातबारा मोहीम, शिधापत्रिका प्रमाणपत्र, संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे आदेश वाटप करण्यात आले. यामध्ये ॲग्रीस्टॅग अंतर्गत फार्मर आयडी काढून घ्यावे , ई पीक पाहणी, लक्ष्मीमुक्ती योजना, सलोखा योजना, शेतकरी यांनी करणे , पी . एम किसान योजना,पांदण रस्त्यांच्या मोहिमे संदर्भात माहिती देण्यात आली. माननीय श्री. आशिष येरेकर ,जिल्हाधिकारी , अमरावती यांचे आदेशानुसार व श्री .राजेश्वर हांडे, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे यांचे मार्गदर्शनात प्रत्येक राजस्व मंडळात शिबिराचे आयोजन करण्यात येत आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष.. श्री . प्रमोद काळे ,नायब तहसिलदार, प्रमुख उपस्थिती श्री.अमानुला खां दिलावरखां , सरपंच , येवदा , श्री.अरविंद पवार, मंडळ अधिकारी , श्री वैभव महाजन ,निरीक्षण अधिकारी, श्री.नकुल सोनटक्के, राजेश मानकर ,सिद्धीकभाई सरपंच उमरी ईतबापूर ,श्री .सुरेश पाटील ,तेलखेडा हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती लीना मोहोड ग्राम महसूल अधिकारी येवदा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद पवार मंडळ अधिकारी यांनी केले. महसूल विभागाअंतर्गत पुरविल्या जाणाऱ्या सर्व योजना व सेवांची माहिती सविस्तरपणे देण्यात आली.कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता योगेश नागरे, प्रदीप गीते, हर्षल गवई, लीना मोहोड सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन प्रदीप गीते ग्राम महसूल अधिकारी ममदाबाद यांनी केले .महसूल सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले असून नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मंडळ अधिकारी श्री.अरविंद पवार यांनी केले.
