
दर्यापूर /रामेश्वर माकोडे
ग्रामपंचायत कार्यालय, येवदा येथे राजस्व मंडळ येवदा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन आज दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आले. सामान्य नागरिक व शेतकरी केंद्रबिंदू मानून महसूल विभाग कार्यरत असून महसूल सप्ताह 2025 अंतर्गत वरील शिबिराचे आयोजन करून यामध्ये शेतकरी, नागरिक ,विद्यार्थी यांना विविध प्रकारचे दाखले ,सातबारा , फेरफार इत्यादी उतारे यांचे वितरण करण्यात आले. उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे व तहसीलदार डॉक्टर रवींद्रकुमार कानडजे यांचे मार्गदर्शनात प्रत्येक राजस्व मंडळ स्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष.. अरविंद पवार, मंडळ अधिकारी,प्रमुख पाहुणे श्री सुरेश पाटील, तेलखेडा व सय्यद समीर सय्यद खलील, उमरी ममदाबाद हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती लीना मोहोड ग्राम महसूल अधिकारी येवदा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद पवार मंडळ अधिकारी यांनी केले .यामध्ये प्रत्येक शेतकरी यांनी ऍग्रीस्टॅक नोंदणी करुन घ्यावी . ई पिक पाहणी शेतकरी यांनी स्वतः करून घ्यावी. पी .एम. किसान योजना ,संजय गांधी ,श्रावणबाळ योजना , जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत वारस नोंदी , लक्ष्मी मुक्ती योजना , सलोखा योजनेबाबत सविस्तरपणे माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी योगेश नागरे, प्रदीप गीते, हर्षल गवई, लीना मोहोड तसेच सर्व महसूल सेवक रंजीत काळे, सुवर्णा बेले ,सुनील अंबाडकर, अमोल ढोके, वृषाली सगणे, रत्नमाला गेठे यांनी परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन प्रदीप गीते यांनी केले.महसूल सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले असून नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मंडळ अधिकारी श्री.अरविंद पवार यांनी केले आहे.