महिलांना मिळाले मोठे प्रतिनिधित्व
अचलपूर/ फिरोज खान
अचलपूर नगर परिषद निवडणूक 2025 साठी वार्डनिहाय आरक्षणाची घोषणा आज (८ ऑक्टोबर २०२५) अचलपूर नगर परिषद कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. निवडणूक विभागाच्या नियमांनुसार पारदर्शक पद्धतीने आरक्षण सोडत (ड्रॉ) काढण्यात आली.या सोडतीसाठी तहसील प्रशासन, नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्येक प्रभाग (वार्ड) साठी आरक्षण क्रमांकानुसार घोषित करण्यात आले.
महिलांना मिळाले व्यापक प्रतिनिधित्व
या वेळी झालेल्या आरक्षण सोडतीत महिलांना मोठे प्रतिनिधित्व मिळाले आहे. अचलपूर नगर परिषदेत एकूण २० प्रभागांपैकी सुमारे अर्धे (५० टक्के) प्रभाग महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.या महिलांसाठी राखीव जागांमध्ये सर्वसाधारण महिला, अनुसूचित जाती (अ.जा.) महिला आणि नागरी मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) महिला या गटांचा समावेश आहे.
वार्डनिहाय आरक्षणाचा तपशील:
1. प्रभाग क्र. 1अ – सर्वसाधारण (महिला)
2. प्रभाग क्र. 1ब – सर्वसाधारण
3. प्रभाग क्र. 2अ – सर्वसाधारण (महिला)
4. प्रभाग क्र. 2ब – सर्वसाधारण
5. प्रभाग क्र. 3अ – ना.मा.प्र. (महिला)
6. प्रभाग क्र. 3ब – सर्वसाधारण
7. प्रभाग क्र. 4अ – अ.जा. (महिला)
8. प्रभाग क्र. 4ब – सर्वसाधारण
9. प्रभाग क्र. 5अ – ना.मा.प्र.
10. प्रभाग क्र. 5ब – सर्वसाधारण (महिला)
11. प्रभाग क्र. 6अ – ना.मा.प्र.
12. प्रभाग क्र. 6ब – सर्वसाधारण (महिला)
13. प्रभाग क्र. 7अ – ना.मा.प्र. (महिला)
14. प्रभाग क्र. 7ब – सर्वसाधारण
15. प्रभाग क्र. 8अ – अ.जा.
16. प्रभाग क्र. 8ब – सर्वसाधारण (महिला)
17. प्रभाग क्र. 9अ – अ.जा. (महिला)
18. प्रभाग क्र. 9ब – सर्वसाधारण
19. प्रभाग क्र. 10अ – सर्वसाधारण
20. प्रभाग क्र. 10ब – अ.जा.
व21. प्रभाग क्र. 11अ – ना.मा.प्र. (महिला)
22. प्रभाग क्र. 11ब – सर्वसाधारण
23. प्रभाग क्र. 12अ – ना.मा.प्र.
24. प्रभाग क्र. 12ब – सर्वसाधारण (महिला)
25. प्रभाग क्र. 13अ – ना.मा.प्र. (महिला)
26. प्रभाग क्र. 13ब – सर्वसाधारण
27. प्रभाग क्र. 14अ – अ.जा. (महिला)
28. प्रभाग क्र. 14ब – सर्वसाधारण
29. प्रभाग क्र. 15अ – ना.मा.प्र. (महिला)
30. प्रभाग क्र. 15ब – सर्वसाधारण
31. प्रभाग क्र. 16अ – सर्वसाधारण (महिला)
32. प्रभाग क्र. 16ब – सर्वसाधारण
33. प्रभाग क्र. 17अ – ना.मा.प्र.
34. प्रभाग क्र. 17ब – सर्वसाधारण (महिला)
35. प्रभाग क्र. 18अ – सर्वसाधारण (महिला)
36. प्रभाग क्र. 18ब – ना.मा.प्र. (महिला)
37. प्रभाग क्र. 19अ – सर्वसाधारण
38. प्रभाग क्र. 19ब – सर्वसाधारण (महिला)
39. प्रभाग क्र. 20अ – अ.जा. महिला कार्यकर्ती राखीव
40. प्रभाग क्र. 20ब – ना.मा.प्र.
41. प्रभाग क्र. 20क – सर्वसाधारण (महिला)
नागरिकांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचा माहोल
आरक्षण सोडतीदरम्यान नागरिक, संभाव्य उमेदवार आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या उत्सुकतेने उपस्थित होते. आपापल्या वार्डचे आरक्षण जाहीर होताच अनेक ठिकाणी आनंद व्यक्त करण्यात आला. काही प्रभागांमध्ये टाळ्यांचा गजर आणि जल्लोषाचे वातावरणही पाहायला मिळाले.
पुढील टप्पा – निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा
या सोडतीनंतर आता अचलपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी पुढील प्रक्रिया — अंतिम मतदार यादी, उमेदवारांचे नामांकन आणि प्रचार मोहिमा — सुरू होणार आहेत.येत्या काही दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून, स्थानिक राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.महिला आरक्षणाच्या वाढत्या प्रमाणामुळे यंदा अनेक नव्या महिला उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे अचलपूर नगर परिषदेच्या राजकारणात नवे चेहरे आणि नवा बदल पाहायला मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये आहे.
