मोर्शी /तालुका प्रतिनिधी
संघ म्हणजे व्यक्ती निर्माण करण्याचा कारखाना आहे. संघाने शाखा नावाची अभिनव कार्यपद्धती संघटनेने संपूर्ण जगाला दिली. भगव्या ध्वजाखाली एक तास एकत्र येऊन त्यामधून रोज संस्कार दिले जाते देशभक्तीचे समाज भक्तीचे भारत मातेला मोठे करण्याकरिता आपसुक संस्कार मिळतात असे उद्बोधन प्रमुख वक्ते म्हणून अमरावती विभाग कार्यवहा डॉ. दत्तात्रेय रत्नपारखी यांनी विजयादशमीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त बोलताना व्यक्त केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला R S S ला आज शंभर वर्षे पूर्ण झाले असल्यामुळे शताब्दी वर्षाचे औचित्य साधून रविवार दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता रामजी बाबा नजीक असलेल्या पंजाब बाबा सभागृहा पासून भव्य दिव्य पथसंचनाला सुरुवात करण्यात आली होती. या पथसंचलनात शेकडो स्वयंसेवक काळी टोपी, पांढरा शर्ट, खाकी पेंट आणि हातामध्ये काठी असा स्वयंसेवकाचा गणवेश धारण करून पथ संचलनात सहभागी स्वयंसेवक गणवेशात शिस्तबद्ध दिसून आले होते. सूर्योदय चौक, गुजरी बाजार, गांधी चौक, प्रभात चौक, आंबेडकर चौक, मंत्री मार्केट, जयस्तंभ चौक, अमरावती रोड शिवाजी शाळा येथील मैदानावर विजयादशमी व शस्त्र पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते. स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. त्याचप्रमाणे संघिक गीत अंकित हरदास, अमृत वाचन आदर्श लांडे, वैयक्तिक गीत चिराग टेंभे या स्वयंसेवकांनी सादर केले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून अमरावती विभाग कार्यवाह डॉ. दत्तात्रेय रत्नपारखी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले महामंडळ तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका प्रचारक डॉ. सौ प्रतिभा घाटोळ उपस्थितांना मार्गदर्शन केले. मोर्शी तालुका संघचालक मनोहर घुलेक्षे व्यासपीठावर उपस्थित होते. या पथ संचनानाचा भव्य दिव्य सोहळा पाहण्याकरिता मार्गक्रमण मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पथ संचलनात सहभागी स्वयंसेवकावर विविध ठिकाणी फुलाचा वर्षाव करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन अजय काळे यांनी केले. यावेळी भारतीय किसान संघाचे सुरेश श्रीराव,सहकार भारती चे संजय गारपवार,पूर्व सैनिक अशोक भुयार, ओम शांतीच्या दीदी, माजी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष नगरसेवक, तसेच मोर्शीतील गणमान्य प्रतिष्ठित व्यावसायिक व मातृशक्ती या उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.येत्या शताब्दी वर्षात संघ पंच परिवर्तनाचे पाच आयाम(कुटुंब प्रबोधन,पर्यावरण,सामजिक समरसता,नागरिक शिष्टाचार,स्वदेशी)अशा पाच आयामांवर संघ काम करणार आहे , या बद्दल वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
