मुख्यमंत्री यांना तहसीलदार ह्यांचे मार्फत निवेदन सादर
संपूर्ण महाराष्ट्रातील बारी बांधवानकडून मुख्यमंत्री ह्यांना विनंती पत्र सादर
अंजनगाव सुर्जी/मनोहर मुरकुटे
समस्त बारी समाजाचे दैवत राष्ट्रसंत संत रूपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक अंजनगांव सुर्जी जि. अमरावती येथे मंजुर होऊन एक वर्ष होत आहे,परंतु काही प्रशासकीय निधी तरतुदीच्या अनुषंगाने स्मारकाचे काम संथगतीने सुरु आहे.ह्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश मा. जिल्हाधिकारी अमरावती यांना दिलेले होते त्यानूसार जिल्हाधिकारी अमरावती व संभंधित विभागाने दि. 23/01/2025 रोजी महासंघाची व समाजबांधवांचे उपस्थितीतआराखडा बैठक घेवून स्मारकाचा प्रस्ताव प्रशासकिय मंजुरीसाठी व आर्थिक तरतुदीसाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठविला होता.तसेच बारी समाजाच्या आर्थीक उन्नतीसाठी संत रूपलाल महाराज आर्थीक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. तथापी संचालक मंडळाची नेमणुक प्रलंबित आहे.सदरच्या चांगल्या कामाबद्धल संपुर्ण बारी समाजाच्यावतीने बारी महासंघाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.बारी समाजाच्या दोन्ही मागण्या शासनाने त्वरित मंजुर केल्याने देशातील समस्त बारी समाज सदैव ऋणी आहे.सदरच्या श्री संत रूपलाल महाराज राष्ट्रीय स्मारकाचे भूमीपूजन हे राज्याचे मुख्यमंत्री दे्वेंद्रजी फडणवीस, व दोन्ही उपमुख्यमंत्री ह्यांचे शुभहस्ते येत्या दिवाळीपुर्वी व्हावे अश्या विनंतीचे पत्र तसेच आर्थीक विकास महामंडळाचे कामकाज तत्पर सुरू व्हावे व त्यावर बारी समाजाचे संचालक मंडळाची नेमणुक व्हावी ह्यासाठी समाज बांधवांची एक बैठक तत्पर लावून समाजाचा जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावावा अश्या विनंतीचे पत्र तहसीलदार पुष्पा सोळंके ह्यांचे मार्फत मुख्यमंत्री दे्वेंद्रजी फडणवीस ह्यांचे कडे केली असून सदरची विनंती पत्राची मोहीम हीं संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे.ह्याप्रसंगी निवेदन देतांना प्रसिद्धी प्रमुख मनोहर मुरकुटे, ,उमेश भोंडे, संजय नाठे, निलेश ढगे, देवीदासजी गुजर,महेंद्र धुळे, नितीन दातीर, दिलीप अस्वार, रमेश धुळे, संजय टिपरे, गोपाल नाठे, गजानन धुळे, रोहित मुरकुटे,सुनील माकोडे सुधाकर टिपरे, विक्रम सातपुते, मंगेश पाटील,राजेश अस्वार, नितीन दातीर,वसंत कपले विनोद पाटील,देविदासजी गुजर,सुमित भावे, अनुप भावे इ समाजबांधव ह्यावेळी उपस्थित होते.
