
रामराव भोयर विद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण व विद्यार्थी सुरक्षा समिती व परिवहन समिती सभा संपन्न
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
स्थानिक मराठा शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित रामराव भोयर विद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे आज दिनांक 16 जुलै 2025 दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा व परिवहन समिती सभा संपन्न झाली. या सभेकरिता प्रमुख वक्ते व अतिथी म्हणून नांदगाव पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर चे पोलीस निरीक्षक, माननीय श्री लांबाडे साहेब व महिला पोलीस कर्मचारी माननीय श्रीमती वाढवे मॅडम व कार्यक्रमाच्या उपस्थित होते. तर कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री अमरसिंह घोरपडे सर तसेच महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा समिती चे तालुका समादेशक श्री मुंढे सर हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री घोरपडे सर यांनी केले व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षा तसेच मुलींच्या सुरक्षेबाबत, विद्यार्थ्यांना प्रवासात येणाऱ्या अडचणी व त्यावर योग्य उपाय याविषयी मा. श्री लांबडे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन श्री प्रवीण टिंगणे सर तर आभार प्रदर्शन श्रीमती मसराम मॅडम यांनी केले.