नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
मराठा शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित रामराव भोयर विद्यालय नांदगाव खंडेश्वर मध्ये शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शारदा उत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. शारदा उत्सवानिमित्त दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अमरसिंह घोरपडे सर यांच्या हस्ते शारदा देवीची स्थापना करण्यात आली. शारदा उत्सव एकूण पाच दिवस विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने शारदा उत्सवामध्ये आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच रांगोळी स्पर्धा बाल चित्रकला, हस्तकला स्पर्धा याचेही आयोजन करण्यात आले होते. उत्सवाच्या निमित्ताने महिला पालकांना विद्यालयामध्ये आमंत्रित करून त्यांच्यासाठी हळदी कुंकू , तसेच विविध खेळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. दिनांक 27 सप्टेंबर रोज शनिवारला शारदा देवीचे विसर्जन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने मराठा शिक्षण संस्था अमरावतीचे सन्माननीय सचिव,माननीय डॉ. अमोल भोयर साहेब यांनी शाळेला भेट दिली व त्यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. याच वेळी त्यांनी रांगोळी प्रदर्शनाची पाहणी केली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शारदा उत्सवामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाचही दिवस अतिशय उत्साहाने सहभाग घेऊन मनोभावे देवीची पूजा अर्चना सुद्धा केली या शारदा उत्सवाच्या यशस्वी ते करिता विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
