नवीन जागेचा प्रस्ताव देऊनही कार्यवाही शून्य
अधिकाऱ्यांनाच नको आहे नांदगाव येथे कार्यालय
नागरिक आंदोलनाच्या तयारीत
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर येथील पंचायत समितीच्या परिसरात पाणी परीक्षण आणि गुणवत्ता तपासणी केंद्र हे सुरळीत पने सुरू असताना येथील गटविकास अधिकारी यांनी पाणीपरीक्षण कार्यालयाची चागल्या स्थितीत असलेली इमारत पाडून टाकल्याने या कार्यालयाला पंचायत समितीच्या मागील बाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची जागा देण्यात आली परंतु ही जागा त्यांच्या पाण्याचे नमुने तपासण्या करणाऱ्या मशीन करीता अपुऱ्या पडत असल्याने या कार्यालयाच्या काही विघ्नसंतोषी अधिकाऱ्यांनी आपल्या सोई करीता हे कार्यालय २२ किमी अंतरावर असलेल्या दुसऱ्या तालुक्यात ही कार्यालय हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या आणि त्या तालुक्यात नवीन जागा सुद्धा बघितली आणि कार्यालय सुरू करणार इतक्यात ही बातमी नांदगाव तालुक्यातील नागरिकांना माहीत पडल्याने येथील नागरिकांनी त्याला कडाडून विरोध दर्शवला आणि वृत्तपत्रात बातम्या सुद्धा प्रकाशित केल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात एकूण ६६ ग्राम पंचायत असून या सर्व ग्रामपंचायतीना २२ किमी अंतरावर असलेल्या दुसऱ्या तालुक्यात जाऊन पाण्याचे नमुने घेणे शक्य होईल काय यामध्ये त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम किती लागेल याची कल्पना वातानुकूलित कार्यालयात बसून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आहे काय यांचे उत्तर त्यांनीच दिलेले बरे मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर पाणी परीक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर येथील कार्यालया करीता काही नवीन जागा बघितल्या त्यांना एक जागा पसंत पडल्याने त्या जागेचा प्रस्ताव त्यांना सादर सुद्धा करण्यात आला या बाबीला तब्बल दोन महिन्याचा कालावधी होऊनही यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.म्हणून नांदगाव येथील काही नागरिकांनी या विभागाच्या काही वरिष्ठ अधिकारी यांना फोनवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून निव्वळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आणि पुन्हा फोन केला असता येथील नागरिकांचा फोनच कोणत्याही अधिकाऱ्यांनी उचलला नाही यावरून नागरिकांनी काय निष्कर्ष काढावा यावरून असे वाटत आहे की पाणी परीक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनाच नांदगाव खंडेश्वर येथे हे कार्यालय नको आहे हे कार्यालय दुसऱ्या तालुक्यात हलविण्याच्या या अधिकाऱ्यांच्या गुप्त हालचाली सुरू असल्याचेच यावरून दिसून येत आहे असे झाल्यास या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात नांदगाव खंडेश्वर तालुका वासीय मोठे जनआंदोलन छेडणार असल्याचे नागरिकांनी प्रसिद्धी पत्रकान्वये म्हटले आहे.
