अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
शारदा महिला मंडळ, विलास शिक्षक कॉलनी, कठोरा नाका, अमरावती यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर रोजी विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे अध्यक्षपद शारदा महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. कविताताई बोंडे यांनी भूषविले. मार्गदर्शिका म्हणून सुप्रसिद्ध वक्त्या सौ. सुचिता ताई बर्वे यांनी महिलांना जीवनातील विविध अंगांवर मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनातून महिलांना आत्मनिर्भरतेचा संदेश मिळाला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय माजी स्वीकृत नगरसेविका सौ. रीता ताई मोकलकर उपस्थित होत्या. तसेच भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीस सौ. जयश्रीताई कुबडे यांनीही आपले विचार व्यक्त केले.शारदा महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. योगिताताई खवले, कोषाध्यक्ष डॉ. सोनल आमले तसेच उत्तम मार्गदर्शिका सौ. कांचन मुरके यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्राजक्ता मेहेरे यांनी केले.या विशेष उपक्रमाला विलास कॉलनी येथील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.
