
अनेक मान्यवरांची उपस्थिती
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर येथील प्रा राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. एक पेड माँ के नाम आणि अभियान अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे संस्थापक सचिव स्वर्गीय सुरेंद्र देशमुख यांचे जयंती निमित्य अभिवादन व विविध प्रजातीचे रोपटे महाविद्यालय परिसरात प्राचार्य डॉ श्रीकांत दांडगे व वनपरीक्षेत्र अधिकारी श्री आशिष कोकाटे यांचे उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन प्रा राजेश मेश्राम तसेच शिक्षक -शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.