नवनिर्वाचित महापौर,उपमहापौर यांचा सन्मान
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे आयोजन
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
शहरातील जोग स्टेडियम ते काॅंग्रेस नगर रोड स्थित शिवविचारपीठ ( खुले रंगमंच) शिवटेकडी येथे दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अमरावतीच्या वतीने गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारीला छञपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्ताने शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उत्सवात १९ फेब्रुवारीला सकाळी ८.३० वाजता छञपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन व मानवंदना तसेच महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व शिवटेकडी संवर्धन समितीचे व्यवस्थापक राजेश शर्मा यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शिवछञपतींचे आदर्श मुल्ये व आजचा महाराष्ट्र या विषयावर यांचे अभ्यास पूर्ण विवेचन केले छत्रपती शिवाजी महाराजांपासून फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील महापुरुषांनी सुद्धा प्रेरणा घेतलेली आहे आणि आपले स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास थोडाफार अमलात आणला तर भारताला महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक वक्ता प्रा. प्रेमकुमार बोके यांनी केले,यासोबतच बाल व्याख्याता कु. आराध्या ठाकरे, व वैदेही कडू यांचे व्याखान संपन्न झाले विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि नवनिर्वाचित महापौर श्रीचंद तेजवानी व उपमहापौर सचिन भेंडे यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आडे तर मुख्य अतिथी खा. बळवंत वानखडे, आ.संजय खोडके, आ. सुलभाताई खोडके, माजी खा. अनंत गुढे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर अभ्यंकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.एन जे राऊत अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अम. , विभागीय माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तिवसा तालुक्याचे तहसीलदार मयूर कळसे, अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासह नगरसेवक अविनाश मार्डीकर, बंडू हिवसे, मिनल सवाई,स्मिता सूर्यवंशी,डॉ मधुरा काहाले आदी मान्यवरांची उपस्थीती लाभली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवगड संवर्धन समितीचे उपाध्यक्ष दिनेश बूब,यांनी केले सूत्र संचालन समन्वयक संजय ठाकरे,अभिजित पडोळे तर आभार प्रदर्शन किशोर जऱ्हाड यांनी केले वणभोजनाने कार्यक्रमाची सांगता कण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेमंत गावंडे,विजय गाडगे,प्रा.प्रवीण राऊत,दीपक लोखंडे,राम बावस्कर,अरविंद पागृत स्वप्नील दिवाण,अभिजित गावंडे,मनीष पाटील,मयूर विघे,मनोज सोळंके, रवि मोहोळ,संदीप वैद्य,पंकज घाटे,ऋषभ राऊत,परेश धर्माळे, निशांत सरफ,गजानन मामणकर,सुधीर दरणे,श्याम राऊत, यांच्या सह मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड , संभाजी ब्रिगेड,सर्व समविचारी संघटना चे पदाधिकारी शिव टेकडी संवर्धन समितीचे जयाताई डवरे,अखिलेश शर्मा, अलीम भाऊ यांनी परिश्रम घेतले.
