
प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांची विद्यापीठाच्या सिनेटवर स्वीकृत सदस्य म्हणून निवड
चांदुर बाजार/एजाज खान
चांदूरबाजार येथील गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेवर स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील उज्वल कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
संत नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी इतिहास विभाग प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर वारंगे यांनी संत नामदेवांच्या जीवन कार्यावर सखोल प्रकाश टाकला संत नामदेवांनी मराठी वारकरी संप्रदायाची पताका थेट पंजाबपर्यंत नेली. त्यांचे अनेक अभंग हिंदी व मराठी भाषेत असल्याचे सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. नंदकिशोर गव्हाळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रवीण परिमल, महिला सहकार्यक्रम अधिकारी डॉ. निधी दीक्षित तसेच महाविद्यालयातील सर्व वरिष्ठ प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.