राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे प्रतिपादन
मांजरखेड (कसबा) येथे बांबू परिषद उत्साहाच
चांदूर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची तळमळ असणारा तुमचा आमदार आहे, बांबू शेतीची चळवळ शेतकऱ्यांसाठी उभी करण्याची आमदार प्रताप अडसड यांची जिद्द असून आम्ही यासाठी त्यांच्यासोबत आहोत असे मत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा बांबू परिषदेचे मार्गदर्शक पाशा पटेल यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व पर्यावरण संतुलनासाठी मांजरखेड कसबा येथे सोमवारी बांबू परिषदेचे आयोजन आमदार प्रताप अडसड यांच्या प्रयत्नाने केले होते. त्यावेळी पाशा पटेल बोलत होते.या प्रसंगी बांबू शेती तज्ञ संजीव कोळपे , शेतकरी नेते नंदू खेरडे, भाजपा धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ निवडणुक प्रमुख रावसाहेब रोठे, सरपंच सौ. देशमुख, माजी जिल्हा परिषद सभापती रामदास निस्ताने, तालुका कृषी अधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. मांजरखेड कसबा येथे आयोजित “बांबू परिषद” या शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक कार्यक्रमास आमदार प्रताप अडसड यांनी उपस्थित राहून बांबू शेतीबद्दल शेतकऱ्यांसाठी एक चळवळ उभारण्याचा मानस व्यक्त केला.

यावेळी ते म्हणाले की, बांबू हे कमी खर्च, कमी पाणी आणि जास्त उत्पन्न देणारे पीक असून शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळल्यास शेतीला नवी दिशा, स्थैर्य आणि समृद्धी मिळू शकते असे आमदार प्रताप अडसड यांनी म्हटले. यावेळी परिसरातील शेकडो शेतकरी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
