
अमरावती / जिल्हा प्रतनिधी
नुकत्याच श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये क्रीडा भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री मा. प्रसादजी महानकर यांनी जगविख्यात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती चे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांची सदिच्छा भेट घेतली त्या वेळी भारतीय खेळ कशा प्रकारे त्याचा प्रचार आणि प्रसार होईल समाज त्याकडे कशाप्रकारे आकर्षित होईल. युवक भारतीय खेळ कुस्ती , मलखांब, कबड्डी यासारख्या खेळाकडे कसा आकर्षित होईल कसा बलशाली होईल अशा अनेक बाबीवर चर्चा करण्यात आली. भारतामध्ये २०३६. साली. होणाऱ्या ऑलम्पिक खेळासंबंधी आपला व्यायाम शाळेचा कसा सहभाग राहील याविषयी सुद्धा सखोल चर्चा करण्यात आली.
सन १९३६ . साली बर्लिन ओलंपिक मध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळा ची चमू भारतीय खेळाचे प्रदर्शन करण्याकरता गेली होती त्याची सुद्धा आठवण वैद्य साहेबांनी करून दिली. प्रसादजी महानकार यांनी क्रीडा भारती भारतामध्ये कशाप्रकारे काम करते आहे त्यासंबंधी सविस्तर माहिती दिली. प्रयागराज येथे कुंभमेळात क्रीडा भारती ने खेळाचा प्रचार भारतीय खेळाचा प्रचार , प्रसार अशा प्रकारे केला भक्तांना खेळण्यास कशाप्रकारे प्रवृत्त केले हे सुद्धा सांगितले. पदमश्री प्रभाकरराव वैद्य यांची सुपुत्रि सौ. दीपा कानेगावकर यांनी सुद्धा अनेक विषयावर चर्चा केली. त्यावेळी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सचिव . ज्येष्ठ कुस्तीपटू प्रा.रवींद्र खांडेकर,. राष्ट्रीय स्वयं संघाचे श्याम निलकरी,. तसेच विदर्भ केसरी डॉ. संजय तीरथकर हे सुद्धा उपस्थित होते. नंतर प्रसादजी महानगर यांनी संपूर्ण व्यायाम शाळेला भेट देऊन कशाप्रकारे कार्य चालते यासंबंधी पाहणी केली. शारीरिक शिक्षण विभागाचे समस्त प्राध्यापक गण व खेळातील तज्ञ व्यक्तींची भेट घेतली.