नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सातरगाव येथील श्री शिव ज्ञानपीठ आश्रमात पू.पू.वेदांताचार्य गुरुवर्य मंधुकर महाराज शास्त्रीजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य समाधी सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा धार्मिक सोहळा शनिवार,दि. १ नोव्हेंबर २०२५ पासून ते शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत कार्तिक शुक्ल एकादशीच्या शुभमुहूर्तावर संपन्न होणार आहे.या आठवडाभर चालणाऱ्या सोहळ्यात श्रीमद् भागवत सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमद् भागवत प्रवचनाचा कार्यक्रम श्री. १०८ स्वामी दिव्येशानंदजी महाराज (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

शनिवार,दि. १ नोव्हेंबर विविध कार्यक्रमाने सोहळ्याची सुरुवात होईल. पुढील दिवसांमध्ये काकड आरती,गीता पाठ,श्रीमद् भागवत पारायण,भागवत कथा,हरिनाम सप्ताह आणि उपसंहाराचे कार्यक्रम होणार आहेत.शेवटच्या दिवशी हरिनामाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कालावधीत विविध प्रवचनकारांचे धार्मिक प्रवचन व कीर्तनाचे कार्यक्रम दररोज संध्याकाळी आयोजित करण्यात आले आहेत.शनिवार, दि. १ नोव्हें. रोजी ह.भ.प.श्री.राहुल महाराज ढगे यांचे प्रवचन होईल. त्यानंतर अनुक्रमे ह. भ. प. श्री. मोहन महाराज वेव्हे (चांदूर रेल्वे), ह. भ. प. श्री. शशिकांत महाराज (नाशिक), ह. भ. प. श्री. १०८ स्वामी दिव्येशानंदजी महाराज (मुंबई), ह. भ. प. श्री. अमोल महाराज खडसे (खडसे), ह. भ. प. श्री. गजानन महाराज बडवे (अमरावती) व ह. भ. प. श्री. नितीन महाराज (आकोट) यांच्या प्रवचनांनी सप्ताह अधिक मंगलमय होणार आहे.शनिवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री क्षेत्र सातरगाव आश्रम येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.समारोपानंतर श्री. १०८ स्वामी गणेशनंद गिरी महाराज (सातरगाव) यांचे काळ्याचे कीर्तन होणार आहे. हा संपूर्ण सोहळा श्री. १०८ स्वामी गणेशनंद गिरी महाराज (चैतन्य) यांच्या मार्गदर्शनाखाली व सातरगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पडणार आहे.अधिक माहितीसाठी 9922121255 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
