
कुठल्याच प्रकारची महसूल विभागाची रॉयल्टी नसताना हजारो ब्रास खनिजाची चोरी.
शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडतो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी जवळील माळेगांव येथुन हजारो ब्रास गीटी व क्रस्ट व मुरुम मंगरुळ चव्हाळा पोलीसांच्या आशिर्वादाने चोरीला चालला पोलिस बघ्याची भूमिका घेत आहे.
पिंपळगाव निपाणी येथील भागात रेती मुरुम व खदानीवरची क्रस्ट डंस्ट व गीटी मुरुम चोरीला जात आहे.मंगरुळ चव्हाळा पोलिस व नांदगाव खंडेश्वर तहसील मधील महसूल विभागाचे काही अधिकारी हप्ता वसुली करीत असल्याची माहिती आहे क्रस्ट ट्रोन खदान कंपणीच्या मालकाच्या माघारी रात्री एका ट्रकटरव्दारे ही चोरी होत असल्याचे सांगितले जाते.
रात्रीच्या वेळात वाढोणा रामनाथ येथुन खरडगाव, दोनद व लोहगाव पादन व चोर रस्त्याने गौन खनिजची तस्करी करणारा ट्रॅक्टटर पिंपळगाव जवळील माळेगांव येथुन गीटी क्रस्ट डस्ट चोरी करीत असल्याची माहिती आहे. मंगरूळ चव्हाळा पोलीस यावर काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असुन जमीनीतील काळ्या दगडा पासून खनिजची प्रकिया करून क्रस्ट डस्ट व गीट्टीचा हजारो ब्रास माल अंदाजे 90000 लाखांचा माल या ठिकाणा वरुन चोरीला गेल्याची माहिती आहे.