
परतवाडा पोलिसांची कामगिरी
परतवाडा/ प्रतिनिधी
दिनांक १७/०७/२०२५ रोजी फिर्यादी बळीराम दहीकर रा. म्हसोना ता.अचलपुर याचे जबानी रिपोर्ट वरून पो.स्टे. परतवाडाला अपराध क्रमांक ४९१/२०२५ कलम १०९ (१) भा.न्या.सं. अन्वये दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयामध्ये दिनांक १७/०७/२०२५ रोजी आरोपी नामे नामदेव बळीराम दहीकर,वय ३५ वर्ष,रा.म्हसोना,ता.अचलपुर जि. अमरावती यास अटक करून दिनांक १९/०७/२०२५ पावेतो मा. न्यायालयाकडुन पि.सी.आर.प्राप्त करण्यात आला.दिनांक १८/०७/२०२५ रोजी त्यास गुन्हयाचे तपासकामी बाहेर काढुन त्यास घटनास्थळावर नेले असता नमुद आरोपीने सोबत असलेल्या अधिकारी व अंमलदार यांची नजर चुकवुन घटनास्थळावरून पळुन गेला. त्यावा शोथ घेतला असता तो मिळुन आला नाही. वरून दिनांक १८/०७/२०२५ रोजी नमुद आरोपी विरूध्द अपराध क्रमांक ४९४/२०२५ कलम २६२ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर गुन्हयातील आरोपी नामे नामदेव बळीराम दहीकर हा फरार असल्याने त्याचे शोधकामी डी. बी. पथक व पोलीस स्टॉपसह दिनांक १८/०७/२०२५ ते दिनांक २१/०७/२०२५ पावेतो त्याचा ग्राम म्हसोना,बुरडघाट,बेलखेडा, हत्तीघाट,मल्हारा,हिरदामल, कोहना,थरखोरा,बानुर,पातुर्डा, जांभुळी,मसोना मल्हारा,निमकुंड, काळविट,गॉडविहीर तसेच मध्यप्रदेश राज्यातील ससोदा,बानुर,धोतरा या गावामध्ये तसेच जंगल परीसरात कसुन शोध घेण्यात असता नमुद आरोपी याने घनदाट जंगलाचा फायदा घेवुन दडुन बसल्याने मिळुन येत नव्हता.दिनांक २१/०७/२०२५ रोजी सकाळी माहीती मिळाली कि फरार आरोपी नामदेव बळीराम दहीकर वय ३५ वर्ष रा. म्हसोना ता. अचलपुर जि. अमरावती हा ग्राम निमदरी मधुन पुढे मांजरकापडी वे जंगलात लपुन बसला आहे. वरून डी. बी. पथक त्याच जंगल भागात आरोपीचा शोध घेत असल्याने त्यांनी तात्काळ तो परीसर गाठुन मांजरकापडी गावाला लागुन आसलेला जंगल परीसर पिंजुन काढुन आरोपीचा कसुन शोध घेतला असता आरोपी हा मांजरकापडी जंगलातील दरीमध्ये लपुन बसलेला मिळुन आला आहे. त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले असुन पुढिल कायदेशिर प्रक्रीया सुरू आहे.आरोपी नामे नामदेव बळीराम दहीकर वय ३५ वर्ष रा. म्हसोना ता. अचलपुर जि. अमरावती हा पोलीसांच्या ताब्यातुन फरार झाल्यापासुन कोणत्याही गावाच्या संपर्कात न येता त्याने मेळघाट भागात पसरेल्या घनदाट जंगलाचा फायदा घेवुन तो लपुन राहला त्याचेजवळ कोणताही मोबाईल नसतांना तसेव त्याची कोणतीही माहीती नसतांना परतवाडा पोलीसंची जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस त्याचा कसोसीने शोध घेवुन ०३ दिवसांनतर त्यास आज दिनांक २१/०७/२०२५ रोजी परतवाडा पोलीसांचे आरोपी शोध कामात यश आले असुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, मा. सहायक पोलीस अधिक्षक उपविभाग अचलपुर डॉ. शुभम कुमार यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के ठाणेदार पोलीस स्टेशन परतवाडा, स.पो.नि. गजानन वाघ, स पो नी संजय आत्राम, पो. हे. कॉ. सचिन होले सुधिर राउत, पो. कॉ. विवेक ठाकरे, घनश्याम किरोले, शुभम शर्मा जितेश बाबील, योगेश बोदुले, पो.कॉ. सचिन कोकणे यांनी केली आहे.