
सहा आरोपींना अटक, एकूण 2.59 लाखांचा मुद्देमाल जप्त
चांदूर रेल्वे / तालुका प्रतिनिधी
स्थानिक पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे अंतर्गत येणाऱ्या डांगरीपुरा परिसरात गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर यशस्वी छापा टाकून एकूण **सहा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन्स तसेच तीन दुचाकी वाहने असा एकूण अंदाजे ₹2,59,200/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.घटनास्थळ व आरोपींची माहिती पुढीलप्रमाणे आहे.गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलीसांनी डांगरीपुरा, चांदूर रेल्वे येथील मेश्राम यांच्या घराजवळील सार्वजनिक रस्त्यालगत, लाईटच्या उजेडात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता आरोपी गोलाकार बसून जुगार खेळताना आढळले.हार-जीत या प्रकाराचा “एक्का-बादशहा” नावाचा जुगार खेळ सुरु होता.ताब्यात घेतलेले आरोपी दिलीप संतोषराव मानकर (36), भिमनगर, चांदूर रेल्वे,निलेश महादेव धणे (36), निरानगर,चांदूर रेल्वे,आकाश हरिदास मेश्राम (32), डांगरीपुरा, चांदूर रेल्वे,कार्तिक दिलीप जरेले (23), मेटे कॉलनी,चांदूर रेलवे विलास अशोकराव लामकासे (38), सेंद्रिपुरा, चांदूर रेल्वे,राजीक अहमद अब्दुल रफिक, आठवडी बाजार,चांदूर रेल्वे,जप्त केलेला मुद्देमाल खालील प्रमाणे आहे.आरोपी क्र. 1 कडून – ₹4700 नगदी, Vivo मोबाईल (₹15,000),आरोपी क्र. 2 कडून – ₹3000 नगदी, Vivo मोबाईल (₹10,000),आरोपी क्र. 3 कडून – ₹6200 नगदी, Oppo मोबाईल (₹12,000),आरोपी क्र. 4 कडून – ₹2150 नगदी,आरोपी क्र. 5 कडून – ₹1100 नगदी, Redmi मोबाईल (₹6000),आरोपी क्र. 6 कडून – ₹1800 नगदी, Vivo मोबाईल (₹10,000),घटनास्थळावरून 52 पत्त्यांच्या ताशांच्या गड्ड्या व ₹200 नगदी आणि वाहने जप्त करण्यात आली त्यामध्ये.हिरो स्प्लेंडर (MH-27 DK-9815) – ₹65,000,हिरो स्प्लेंडर (विनाक्रमांक) – ₹65,000, हिरो पॅशन प्रो (MH-27 BN-1393) – ₹55,000,एकूण रोख जप्ती – ₹21,200,मोबाईल व वाहनांसह एकूण मुद्देमालाचा अंदाजे किंमत – ₹2,59,200 आहे.ही कारवाई पंचांसमक्ष पार पडली असून पुढील तपास व कायदेशीर कार्यवाही पोलीस स्टेशन चांदूर रेल्वेमार्फत करण्यात येत आहे.