
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोठाडा या गावांमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी अमरावती श्री चेडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अनिल पांडुरंगजी इंगोले यांच्या शेतात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सोयाबीन पिकाची शेतकरी शेतीशाळा घेण्यात आली. सदर शेती शाळेमध्ये सहाय्यक कृषी अधिकारी पि यू लाडके यांनी सोयाबीन पीक परिसंस्था अभ्यास, सोयाबीन पिकावरील वरील कीड रोग व्यवस्थापन तसेच तन नियंत्रण याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले. सदर शेती शाळेमध्ये गावातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांपैकी काही शेतकरी यांनी आपले शेतीविषयक मनोगत व्यक्त केले. अशा प्रकारे एकूण सहा सोयाबीन पिकाच्या शेतीशाळा घेण्यात येणार असून हा दुसरा वर्ग संपन्न झाला.