
प्रेरणा पंधरवाडा उपक्रम अंतर्गत वृक्षारोपण
अंजनगाव सूर्जी / तालूका प्रतिनिधी
दिनांक 27 जून 2025 रोजी ” मा उद्धव बाळासाहेब ठाकरे ( माजी मुख्यमंत्री) यांचा जन्मदिवस प्रेरणा मास म्हणून दरवर्षी सर्वत्र साजरा होत आहे. त्या अनुषंगाने प्रेरणा मास” उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अध्यक्ष आमदार सन्मा. ज. मो. अभ्यंकर साहेब तसेच शिवसेना आमदार मा श्री गजानन लवटे यांचे शुभ हस्ते विद्यानिकेतन शिक्षण संकुल, अंजनगाव सुर्जी , जिल्हा अमरावती येथे विद्यार्थी, शिक्षक, नागरिक व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.विद्यानिकेतन शिक्षण संकुलच्या संपूर्ण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.वृक्ष लावणे व जगविणे तसेंच त्याची देखभाल या बाबत प्रत्येक वृक्ष विद्यार्थ्यांनि दत्तक घेतले. त्याची निगा राखण्याची हमी दिली.उपस्थित सर्वांनी एक वृक्ष जगविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली.संपूर्ण राज्यात हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला जात आहे.वृक्षारोपण काळाची गरज आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या उपक्रमाला शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष श्री वजकास येवले, श्री मुकेशजी शिरसाट शिक्षक सेना पदाधिकारी,श्री राजाभाऊ राजनकर( जिल्हाध्यक्ष) शिक्षक सेना पदाधिकारी श्री अनिल कोल्हे, श्री संदीप खंडारे, श्री निलेश उमक,श्री अरविंद मेहरे, श्री संजय देवरे,श्री पंकज वानखडे,श्री जगदीश शेरकार,श्री नितिन सावरकर,श्री गजानन ठाकरे,श्री रविंद्र येउल इत्यादी पदाधिकारी उपास्थित होते.