नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
पिंपरी निपाणी येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ३ मेगावाट क्षमतेचा विद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी अमरावती मंडळाचे अधिकारी दीपक देहवाले, कार्यकारी अभियंता लांडे, उपकार्यकारी अभियंता श्री. यंनगणटीवार तसेच पापड पावर हाऊसचे अधिकारी कुटेमाटे व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी गावातील सरपंच सौ. योगिता विशाल रिठे, उपसरपंच सौ. पुष्पा राजू प्रगणे, ग्रामपंचायत सदस्य गणेश उघडराव धामणे, प्रतीक ज्ञानेश्वर रिठे, सौ. पुष्पा रमेश रिठे, सौ. दीपिका किशोर रिठे, सौ. सुजाता प्रदीप डोंगरे, पोलीस पाटील संदीप डोंगरे, तंटामुक्ती अध्यक्ष शमी पठाण आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.या प्रकल्पामुळे पापड सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या गावांना शेतीसाठी दिवसाला ८ तास नियमित वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या श्रमाची बचत होऊन शेती अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात होणाऱ्या सकारात्मक बदलाबद्दल समाधान व्यक्त केले.शेतकऱ्यांना खरी मदत मिळावी यासाठी मी केलेले प्रयत्न आज यशस्वी झाले याचा मला मनापासून आनंद आहे असे उद्घाटनकर्त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रकल्पाच्या शुभारंभाला प्रतिसाद दिला.
