शहिदाच्या मूर्ती स्थापनेकरिता सर्व पक्ष एकवटले.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर येथील विर सुपुत्र शहीद पंजाब उईके यांना दहशतवाद्यांशी लढताना १८ सप्टेंबर २०१६ रोजी उरी कश्मीर येथे वीरमरण आले होते.त्या विर सुपुत्राच्या मूर्तीचे अनावरण देशभक्तिमय गजरात शहीद उद्यान, ओंकारखेडा नांदगाव खंडेश्वर येथे करण्यात आले.नांदगाव खंडेश्वर येथील प्रतिष्ठित नागरिक किशोर शिरभाते व त्यांच्या पत्नी सीमाताई शिरभाते यांनी शहीद पंजाब उईके यांची मूर्ती भेट दिल्यानंतर त्या मूर्तीची स्थापना भव्य दिव्य कार्यक्रमात व देशभक्तीमय वातावरणात व्हावी या संकल्पनेतून नांदगाव खंडेश्वर शहरातील सर्व पक्षीय नेते व नागरिक एकत्र येऊन शहीद पंजाब उईके स्थापना कृती समिती तयार करण्यात आली. त्या कृती समितीच्या माध्यमातून बुधवार दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, शहीद उद्यान ओंकारखेडा येथे घेण्यात आला. तसेच गुरुवार दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी शहरातील गजानन महाराज मंदिर ते शहीद उद्यान पर्यंत देशभक्तीमय गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण देशभक्तीपर देखावे, सैनिकांच्या वेशात तिरंगा घेऊन तरुण मुले, रथ, घोडे इत्यादीचा समावेश असल्यामुळे संपूर्ण नांदगाव नगरीचे वातावरण देशभक्तीमय झाले होते. अश्या देशभक्तीमय वातावरणात शहीद उद्यान येथे वीर सुपुत्र पंजाब उईके यांच्या मूर्तीचे अनावरण आमदार श्री प्रताप अडसड व माजी आमदार श्री. वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा विरमाता बेबीताई जानराव उईके या होत्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज कडू, व लेफ्टनंट कमांडर अलीम पटेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पोलीस बँड पथकाच्या वतीने त्या विर सुपुत्राला शासकीय मानवंदना देण्यात आली यावेळी वीर सुपुत्र पंजाबच्या आठवणीमुळे विरमाता बेबीताई विके यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघर्ष युवा संघटनचे कार्यकर्ते व शहीद पंजाब उईके मूर्ती स्थापना कृती समितीचे अध्यक्ष राजेश पाठक, सचिव दिनेश शेळके, कोषाध्यक्ष अमोल धवसे फिरोज खान व फिरोज लधानी. प्रकाश मारोटकर, उपाध्यक्ष अक्षय पारसकर अविनाश ब्राह्मणवाडे, किशोर शिरभाते व मो. साजिद मो. शब्बीर, सहसचिव निलेश ईखार व अरुण लहाबर, प्रसिद्ध प्रमुख आझाद शिंदे तसेच सदस्य ओंकार ठाकरे, निशांत जाधव आशिष खंडार, जरीन शेख, मंगेश देवळे, राजेश शेंडे,इत्यादींनी परिश्रम घेतले.
