
चोरी गेलेल्या तीन मोटारसायकली हस्तगत आणि ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त.
परतवाडा / प्रतिनिधी
अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या सूचनेनुसार वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी परतवाडा पोलिसांनी विशेष मोहीम राबवून एक मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत तीन चोरी गेलेल्या मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून सुमारे ९५,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दिनांक १६ जुलै २०२५ रोजी राजेश पंजाबराव ढोकणे (वय ४५, रा. सालेपुर पांढरी,ता.अचलपूर) यांनी परतवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती की, त्यांच्या मालकीची हीरो स्प्लेंडर आय स्मार्ट (MH 27 BC 8945, सिल्व्हर व काळ्या रंगाची) मोटारसायकल अग्रवाल ट्रेडर्स, मिश्रा लाईन,परतवाडा येथून चोरीस गेली आहे. या तक्रारीवरून परतवाडा पोलीस ठाण्यात गु.र. नं. ४८७/२०२५, भादंवि कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास करत असताना डीबी पथक गुन्हे शोध कामात गुंतले असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, अंजनगाव स्टॉप परिसरात एक व्यक्ती आय स्मार्ट मोटारसायकल विक्रीच्या उद्देशाने फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन राहुल रामू कास्देकर (वय २७, रा.चंझर,ता.अचलपूर) या संशयितास ताब्यात घेतले.त्याच्याकडे विचारपूस केल्यावर त्याच्याकडे असलेली हीरो स्प्लेंडर आय स्मार्ट मोटारसायकल (MH 27 BC 8945) ही चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून परतवाडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४९०/२०२५,भादंवि कलम ३७९ नुसार आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीस विश्वासात घेऊन पुढील चौकशी केली असता त्याने परतवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या इतर दोन चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपीकडून खालील मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. त्यामध्ये खालील मोटासायकलचा समावेश आहे.
1. हीरो स्प्लेंडर आय स्मार्ट (MH 27 BC 8945) – किंमत ₹40,000/-
2. हीरो होंडा सुपर स्प्लेंडर (MH 27 AW 8761) – किंमत ₹25,000/-
3. हीरो होंडा स्प्लेंडर प्रो (MH 27 AT 1785) – किंमत ₹30,000/-
एकूण किंमत – ₹95,000/ असून
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत,व सहायक पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार (उपविभाग अचलपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के (परतवाडा ठाणेदार) यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या कारवाईत स.पो.नि.संजय अत्राम, पो.हे.कॉ.सचिन होले, सुधीर राऊत,पो.कॉ. विवेक ठाकरे, घनश्याम किरोले, शुभम शर्मा, जितेश बाबील, योगेश बोडुळे, व सचिन कोकणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.परतवाडा पोलीस स्टेशनच्या या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढला असून मोटारसायकल चोरीप्रकरणी मोठा गुन्हा उघडकीस आला आहे.